Astrology : भारतीय संस्कृतीत आणि ज्योतिष शास्त्रात वेळेला फार आध्यात्मिक महत्त्व आहे. कोणतंही शुभ कार्य, प्रवास, मुहूर्त किंवा निर्णय घेण्याआधी आपण वेळेचा विचार नक्कीच करतो. अनेकदा आपल्या अवतीभोवती अशा काही गोष्टी घडतात ज्याचा आपण कधी विचारच केला नसतो. या गोष्टी आपल्या अगदी नकळत घडतात पण त्याचा आपल्याला नक्कीच फायदा होतो. अशाच अनपेक्षित गोष्टींपैकी एक म्हणजे घड्याळाची ठराविक वेळ. खरंतर, आपल्या सर्वांनाच 11:11 या वेळेबद्दल, त्याच्या महत्त्वाबद्दल माहित आहे. असं म्हणतात की, 11:11 या वेळेत कोणतीही इच्छा मागितली तर ती पूर्ण होते. याचं कारण असं आहे की, या काळात मागितलेल्या इच्छा युनिव्हर्स ऐकत असतो. पण, युनिव्हर्सकडून नेमका कोणता संदेश मिळतो ते जाणून घेऊयात.
दुपारची 01:01 ची वेळ...
खरंतर, तसं पाहायला गेल्यास, दुपारची 01 वाजून 01 मिनिटांची वेळ आपल्यासाठी सामान्य असते. पण, ज्योतिषीय शास्त्रातून, संख्यात्मकदृष्ट्या आणि आध्यात्मिक दृष्टीने पाहिल्यास याचं महत्त्व फार वेगळं आहे. तर 1 ही संख्या आत्मविश्वास, इच्छाशक्ती, कृती आणि धैर्यसुद्धा दर्शवते. ही संख्या ब्रह्मांडाचं प्रतीक मानली जाते. म्हणूनच 01 वाजून 01 मिनिटं असा क्षण असतो जिथे तुमची आतली ऊर्जा आणि युनिव्हर्सची कृपा एक होते.
त्यानुसार, जर तुम्हाला वारंवार ही वेळ दिसत असेल तर तुमच्या जीवनात नवीन शक्ती नक्कीच येऊ शकतात. तुमच्या विचारांची शक्ती खूप तीव्र होऊ शकते. युनिव्हर्स सांगतंय की स्वत:वर विश्वास ठेवा आणि पुढे जात राहा. म्हणून यापुढे जर तुम्हाला ही वेळ दिसली तर काही सेकंदासाठी थांबा. डोळे मिटा आणि आपल्या मनात एक इच्छा स्पष्टपणे धरा. आणि युनिव्हर्सवर विश्वास ठेवा की योग्य वेळेला योग्य गोष्ट तुमच्यापर्यंत नक्की येईल.
पण जर तुम्हाला 01:01 मिनिटं ही वेळ वारंवार घड्याळात दिसत असेल तर त्याचा अर्थही अतिशय खास आहे. तोही युनिव्हर्सकडून येणारा एक खास संदेश असतो असं म्हणतात. आता तो कसा? असा प्रश्न तुमच्या मनात निर्माण झाला असेल. तर, जाणून घेऊयात.
तर 1 ही संख्या आत्मविश्वास, इच्छाशक्ती, कृती आणि धैर्यसुद्धा दर्शवते. ही संख्या ब्रह्मांडाचं प्रतीक मानली जाते. म्हणूनच 01 वाजून 01 मिनिटं असा क्षण असतो जिथे तुमची आतली ऊर्जा आणि युनिव्हर्सची कृपा एक होते.
युनिव्हर्स मिळतो खास संदेश
त्यानुसार, जर तुम्हाला वारंवार ही वेळ दिसत असेल तर तुमच्या जीवनात नवीन शक्ती नक्कीच येऊ शकतात. तुमच्या विचारांची शक्ती खूप तीव्र होऊ शकते. युनिव्हर्स सांगतंय की स्वत:वर विश्वास ठेवा आणि पुढे जात राहा. म्हणून यापुढे जर तुम्हाला ही वेळ दिसली तर काही सेकंदासाठी थांबा. डोळे मिटा आणि आपल्या मनात एक इच्छा स्पष्टपणे धरा. आणि युनिव्हर्सवर विश्वास ठेवा की योग्य वेळेला योग्य गोष्ट तुमच्यापर्यंत नक्की येईल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :