Astrology : वैदिक ज्योतिष शास्त्र आणि अंक ज्योतिष शास्त्राला फार महत्त्व आहे. अंक ज्योतिष शास्त्रानुसार, व्यक्तीचा स्वभाव आणि त्याची आवड निवड सांगता येते. तसेच, त्या व्यक्तीचे कोणकोणते गुण आहेत आणि त्याचा येणारा काळ कसा असेल या सगळ्याचा अंदाज जन्मतारखेनुसार काढला जातो. या ठिकाणी आपण अशा काही लोकांबद्दल जाणून घेणार आहोत ज्या जन्मतारखेचे लोक शनीला फार प्रिय आहेत. या जन्मतारखेच्या लोकांवर नेहमी शनीची कृपा असते.
'या' 3 जन्मतारखेला जन्मलेले लोक असतात भाग्यवान
अंकशास्त्रात या तीन जन्मतारखेच्या लोकांना फार महत्त्वाचं स्थान देण्यात आलं आहे. त्यानुसार, 8, 17 आणि 26 या शनीच्या अत्यंत प्रिय राशी आहेत. कोणत्याही महिन्याच्या 8,17 आणि 26 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 8 असतो. या लोकांवर शनीची सदैव कृपा असते. त्यामुळे या लोकांवर शनीचा सकारात्मक प्रभाव पडतो. या जन्मतारखेचे लोक फार आत्मविश्वासू असतात. चांगली गुंतवणूक करण्याची कला यांच्या अंगी असते. तसेच, आपलं ध्येय गाठण्यासाठी मेहनत घेण्याची कलादेखील यांना चांगली अवगत असते. या जन्मतारखेच्या लोकांची आर्थिक स्थिती देखील मजबूत असते.
शनिवारी जन्मलेले लोक
ज्या लोकांचा जन्म शनिवारच्या दिवशी झाला आहे. अशा लोकांवर शनिदेवाची विशेष कृपा असते. या जन्मतारखेचे लोक शनीला फार प्रिय असतात. तसेच, शनिवारी जन्मलेल्या लोकांचा स्वभावदेखील फार गंभीर असतो. ते आपल्या कामात निपुण असतात. यांच्या कुंडलीत शनी अत्यंत शुभ स्थानी असतात. आपल्या आयुष्यात यश संपादन करतात.
मकर आणि कुंभ राशीचे लोक
मकर आणि कुंभ राशीचा स्वामी ग्रह शनी देव आहे. या दोन राशींच्या लोकांवर शनीची विशेष कृपा असते. मकर आणि कुंभ राशीचे लोक शनीला प्रचंड प्रिय असतात. शनीदेवाच्या कृपेने हे लोक फार मेहनती आणि आत्मनिर्भर असतात. हे लोक करिअरच्या उंच शिखरावर पोहोचतात.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: