Astrology : आज 12 जुलै आजचा दिवस शुक्रवार. ग्रहांच्या स्थितीनुसार, आजचा दिवस फार महत्त्वाचा मानला जातोय. आज आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील षष्ठी तिथी आहे. तसेच, आज रवि योग (Yog), शिव योग आणि उत्तराफाल्गुनी नक्षत्र असे अने शुभ योग जुळून आले आहेत. त्यामुळे आजचा दिवस हा अनेक अर्थांनी खास आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभयोगाचा परिणाम पाच राशींना (Zodiac Signs) होणार आहे. या राशी नेमक्या कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात. 


मेष रास (Aries Horoscope)


मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फलदायी असणार आहे. देवी लक्ष्मीच्या कृपेने तुम्हाला कोणत्याच गोष्टींची कमतरता भासणार नाही. तुमच्या प्रत्येक मेहनतीचं फळ तुम्हाला मिळेल. तसेच, विद्यार्थ्यांकडून चांगला अभ्यास होण्याची शक्यता आहे. नोकरदार वर्गातील लोकांना कामाच्या ठिकाणी प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. तसेच, या काळात तुमचं आरोग्य देखील चांगलं असेल. 


सिंह रास (Leo Horoscope)


सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस भाग्याचा असणार आहे. तुम्ही ज्या गोष्टीसाठी मेहनत घेत आहात त्याचं फळ तुम्हाला नक्की मिळेल. तसेच, तुम्ही आखलेल्या योजना यशस्वी होतील. कुटुंबातून एखादी चांगली बातमी ऐकायला मिळेल. ज्येष्ठ व्यक्तींचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असेल. एकंदरीतच आजचा दिवस हा तुमच्या आयुष्यातील खास दिवस असणार आहे. 


कन्या रास (Virgo Horoscope)


कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सुखकारक असणार आहे. देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या धन-संपत्तीत प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे. तुमच्या व्यवसायाला चांगली गती मिळेल. नोकरदार वर्गातील लोकांना कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांचा तसेच सहकाऱ्यांचा चांगला पाठिंबा मिळेल. या काळात तुमच्या पदोन्नतीतही चांगली वाढ होण्याची शक्यता आहे. 


धनु रास (Sagittarius Horoscope)


दनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फार खास असणार आहे. आजच्या दिवशी तुमचं आरोग्य एकदम ठणठणीत असणार आहे. मात्र, बाहेरचे तेलकट पदार्थ खाणे टाळा. देवी लक्ष्मीचा तुमच्यावर आशीर्वाद असणार आहे. त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत असणार आहे. वैवाहिक जीवन तुमचं आनंदात जाईल. जोडीदाराचा तुम्हाला चांगला पाठिंबा मिळेल. 


मीन रास (Pisces Horoscope)


मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक असणार आहे. जर तुमचं एखादं काम अनेक दिवसांपासून रखडलं असेल तर ते या काळात पूर्ण होण्याची शक्यता आहे. तुम्ही नवीन व्यवसायाचा लाभ देखील घेऊ शकता. यासाठी आत्ताच चांगल्या योजना राबवा. त्यावर मेहनत घेत राहा. तुमची आर्थिक स्थिती चांगली असणार आहे. मित्रांच्या सहकार्याने तुमची सगळी कामं सोपी होतील. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


हेही वाचा :


Horoscope Today 12 July 2024 : आजचा शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? कोणाला मिळणार लाभ तर कोणाला होणार तोटा? आजचे राशीभविष्य