Astrology Panchang Yog 7 February 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 7 फेब्रुवारी म्हणजेच शुक्रवारचा दिवस आहे. आजचा दिवस शुभ आहे. कारण आजच्या दिवशी मालव्य राजयोग (Yog) मीन राशीत प्रवेश करणार आहे. तर, गजकेसरी योगाने रोहिणी नक्षत्रात प्रवेश केला आहे. यामुळे इंद्र योग जुळून आला आहे. त्यामुळेच आजच्या दिवसाचं महत्त्व फार वाढलं आहे. आजच्या दिवसाचा काही राशींना चांगलाच लाभ मिळणार आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा परिणाम 5 राशींवर होणार आहे. या राशींचा सामाजिक क्षेत्रात चांगला विकास होईल. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ असणार आहे. आजच तुम्हाला तुमच्या कामात चांगला लाभ मिळेल. तसेच, धार्मिक स्थळी तुम्ही यात्रेला जाऊ शकता. आज तुमच्या मार्गातील अडथळे दूर होतील. तसेच, सकारात्मक वातावरण तुमच्या आजूबाजूला निर्माण होईल. आज तुम्हाला तुमच्या मित्रांचा चांगला पाठिंबा मिळेल. तसेच, तुमचा दिवस चांगला जाईल.
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस भाग्याचा असणार आहे. आज तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल. सामाजिक कार्यात तुमचा चांगला विस्तार झालेला दिसेल. तसेच, अनेक दिवसांपासून तुमचे रखडलेले काम पूर्ण होण्याची शक्यता निर्माण होत आहे. तसेच, तुमच्या मुलांचा चांगला विकास झालेला दिसेल. तुम्ही धार्मिक यात्रेत सहभागी व्हाल.
तूळ रास (Libra Horoscope)
तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस यशाचा असणार आहे, आज तुमचे रखडलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. तसेच, तुमच्यामध्ये आज नवीन काहीतरी शिकण्याची प्रेरणा जागृत होईल. तुम्ही स्वत:साठी वेळ काढाल. तसेच, नवीन गोष्टी शिकून घ्या. कलात्मक गुणांना चांगला वाव मिळेल. मित्र-परिवाराचा तुम्हाला चांगला पाठिंबा लाभेल. तसेच, आरोग्याची काळजी घ्या.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी असणार आहे. आज तुम्हाला दिवसभरात एखादी शुभवार्ता मिळेल. त्यामुळे तुमचं मन प्रसन्न होईल. सामाजिक कार्यात तुमचा चांगला सहभाग पाहायला मिळेल. आज तुमच्यावर येणारं एखादं संकट टळेल. देवी लक्ष्मीचा तुमच्यावर आशीर्वाद असाणार आहे. तुम्ही मागाल ती इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. समाजात तुमचा मान-सन्मान वाढलेला दिसेल.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आर्थिक बाबतीत सक्षम असणारा आहे. तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. त्यामुळे तुम्हाला पैशांची कोणतीच कमतरता जाणवणार नाही. आज धार्मिक कार्यात तुमची जास्त रुची वाढेल. तसेच, देवी लक्ष्मीचा तुमच्यावर आशीर्वाद असेल. विद्यार्थ्यांचं अभ्यासात मन रमेल. तुमच्यातील खेळाडू वृत्ती जागृत होईल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: