Astrology Panchang Yog 4 June 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 4 जूनचा दिवस म्हणजेच आजचा वार बुधवार. आजचा दिवसस हा लाडक्या गणरायाला समर्पित आहे. आज चंद्राने कन्या राशीत प्रवेश केला आहे. याचा स्वामी ग्रह बुध ग्रह आहे. तसेच, आजच्या दिवशी बुधादित्य योगाचा शुभ संयोग जुळून आला आहे. त्यामुळे आजचा दिवस फार खास असणार आहे. त्याचबरोबर, आज गजकेसरी योगाचा देखील शुभ संयोग निर्माण झाला आहे. त्यामुळे आजच्या दिवसाचा लाभ ज्या राशींना मिळणार आहे. त्यांच्यासाठी उत्पन्नाचे अनेक सोर्स निर्माण होतील.
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ 5 राशींना मिळणार आहे. या राशी नेमक्या कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फार शुभ असणार आहे. आज तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ मिळेल. तसेच, तुमच्या कामकाजाचा चांगला विस्तार वाढलेला असेल. तुमच्या करिअरमध्ये प्रगती झालेली दिसेल. तसेच, तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवे स्त्रोत निर्माण होतील. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहील.
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस भाग्याचा असणार आहे. आज तुम्हाला मानसिक शांती मिळेल. तसेच, जर तुम्हाला एखादी नवीन प्रॉपर्टी किंवा वाहन खरेदी करायचं असेल तर त्यासाठी आजचा दिवस फार शुभ असणार आहे. आज तुमच्या मित्रपरिवारात स्नेह वाढलेलं दिसेल. तसे, जोडीदाराचा चांगला सपोर्ट तुम्हाला मिळेल.
कन्या रास (Virgo Horoscope)
कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आज तुमच्या करिअरपासून ते तुमच्या व्यवसायापर्यंत तुम्हाला यश मिळेल. तसेच, दिवसाच्या शेवटी तुम्हाला एखादी चांगली शुभवार्ता ऐकायला मिळेल. समाजात तुमचा मान-सन्मान वाढलेला दिसेल. तसेच, भौतिक सुख-सुविधांचा तुम्ही लाभ घ्याल.
तूळ रास (Libra Horoscope)
तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक असणार आहे. मात्र, आज तुम्ही तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. तसेच, विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासात मन रमवणं गरजेचं आहे. संध्याकाळचा वेळ तुम्ही धार्मिक कार्यात गुंतवाल. मित्रांच्या सहकार्या तुमची सगळी कामे तुम्हाला पूर्ण करता येतील.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ राशीसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. तसेच, नोकरदार वर्गातील लोकांना कामाच्या ठिकाणी चांगला लाभ मिळेल. तसेच, टेक्नॉलॉजीशी संबंधित लोकांना आज लाभ मिळू शकतो. तसेच, तुमच्या आत्मविश्वासात चांगली वाढ झालेली दिसेल. आज एखादी किंमती वस्तू तुमच्या हाती लागेल.
हे ही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)