Astrology Panchang Yog 31 July 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 31 जुलै 2025 चा दिवस आहे. आज जुलै महिन्याचा शेवटचा दिवस आहे. तसेच, आजच्या दिवशी चंद्राने तूळ राशीत प्रवेश केला आहे. आजच्या दिवशी अनेक शुभ ग्रहांचा शुभ संयोग जुळून येणार आहे. आजच्या दिवशी बुध आणि सूर्य ग्रहाची युती होणार आहे. त्यामुळे बुधादित्य योग जुळून येणार आहे. त्याचबरोबर, गजलक्ष्मी नावाचा शुभ योग देखील जुळून येणार आहे. त्यामुळे आजचा दिवस खास आणि महत्त्वाचा असणार आहे.
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून येणाऱ्या शुभ योगाचा लाभ 5 राशींना मिळणार आहे. या राशी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीसाठी आजचा दिवस फार शुभ असणार आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ मिळेल. तसेच, तुमच्या कामाकाजाचा विस्तार झालेला दिसेल. तसेच, आजच्या दिवशी तुम्हाला धनलाभ देखील होऊ शकतो. कोर्ट कचेरीच्या संदर्भातील तुमची कामे वेळेत पूर्ण होतील. तसेच, नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस फार शुभ असणार आहे.
कन्या रास (Virgo Horoscope)
कन्या राशीसाठी आजचा दिवस हा आत्मविश्वासाचा असणार आहे. आज तुम्ही कोणताही निर्णय घेताना विचारपूर्वक निर्णय घ्याल. तसेच, तुमच्या बॉसकडून तुमच्या कामाचं कौतुक केलं जाईल. तसेच, सामाजात तुमचा मान-सन्मान वाढेल. राजकीय क्षेत्रात तुमची प्रगती पाहायला मिळेल. तसेच, तुमचे वैवाहिक जीवन चांगले राहील.
तूळ रास (Libra Horoscope)
तूळ राशीसाठी आजचा दिवस हा उमेदीचा असणार आहे. लवकरच तुमचे परदेशात जाण्याचे योग जुळून येणार आहे. तसेच, तुमच्या व्यवसायात तुमची चांगली प्रगती दिसून येईल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाची प्रशंसा केली जाईल. तुमच्या व्यक्तिमत्वातही बदल घडून येतील. पार्टनरबरोबर छान काळ घालवाल. तसेच, लवकरच तुम्हाला शुभवार्ता मिळण्याची शक्यता आहे.
धनु रास (Saggitarius Horoscope)
धनु राशीसाठी आजचा दिवस फार खास असणार आहे. या कालावधीत तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे तुम्हाला पूर्ण करता येतील. तसेच, तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवे सोर्स उपलब्ध होतील. सरकारी कामे तुमची लवकर पूर्ण होतील. सामाजिक कार्यात तुम्ही सक्रिय व्हाल. तसेच, तुम्ही ज्या कामाचं नियोजन केलं आहे ती कामे वेळेत पूर्ण होतील.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ राशीसाठी आजचा दिवस भाग्याशाली असणार आहे. आजच्या दिवशी तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे काम करता येईल. तसेच, तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळेल. त्याचबरोबर, ग्रहांची स्थिती देखील चांगली असल्या कारणाने तुमच्या मार्गात कोणताच अडथळा येणार नाही. मानसिक शांती मिळेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :
August 2025 Monthly Horoscope : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींसाठी ऑगस्टचा महिना कसा असणार? कोणावर असणार शंकराची कृपा? मासिक राशीभविष्य