Astrology Panchang Yog 30 March 2025 : आज 30 मार्चचा दिवस. म्हणजेच आज रविवार आहे. तसेच, आज गुढीपाडव्याचा (Gudi Padwa) सण देखील देशभरात साजरा केला जातोय. त्यामुळे आजचा दिवस खास आहे. तसेच, आज सर्वार्थ सिद्धी योगदेखील (Yog) जुळून आला आहे. त्यामुळे आजच्या दिवशी शुभ राशींना चांगला लाभ मिळणार आहे. या राशींच्या आर्थिक संपत्तीत चांगली भरभराट होईल. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ 5 राशींना मिळणार आहे. या भाग्यशाली राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
वृषभ रास (Taurus Horoscope)
आजचा दिवस तुमच्यासाठी भाग्याचा असणार आहे. हाती घेतलेल्या कार्यात कोणताही अडथळा येणार नाही. तसेच, सामाजिक क्षेत्रात तुमच्या कामाचं भरपूर कौतुक होईल. तुमचाय सत्कार देखील करण्याची शक्यता आहे. भौतिक सुख-सुविधांचा चांगला लाभ घ्याल. कुटुंबात आनंदी वातावरण निर्माण होईल.
कर्क रास (Cancer Horoscope)
कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सुख-समाधानाचा असणार आहे. आजचा दिवस शुभ असल्या कारणाने आज तुम्ही कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात करु शकता. तुम्हाला वडिलोत्पार्जित संपत्तीतून चांगला लाभ मिळेल. समाजात तुमचा मान वाढेल. तुमच्या मताचा आदर केला जाईल. तसेच, आरोग्याच्या बाबतीत चिंता करण्याची गरज नाही.
कन्या रास (Virgo Horoscope)
कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खास असणार आहे. तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला चांगली प्रगती पाहायला मिळेल, तसेच, जवळच्या नातेवाईकांशी भेटीगाठी वाढतील. आज जोडीदाराकडून तुम्हाला छानशी भेटवस्तू मिळेल. तसेच, देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या सुख-समृद्धीत चांगली भरभराट पाहायला मिळेल. नवीन कार्याची सुरुवात करु शकता.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आर्थिक भरभराटीचा असणार आहे. आज तुम्ही पैशांची बचत करु शकता. तुम्हाला चांगला धनलाभ होईल. तसेच, नवीन कार्याची सुरुवात करु शकता. शनीचं संक्रमण असल्यामुळे थोडं सावध राहण्याची गरज आहे. मात्र तुमच्या कार्यात कोणताच अडथळा येणार नाही.
मीन रास (Pisces Horoscope)
मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आशेचा किरण असणार आहे. आज तुम्ही जी काही कामे ठरवली होती ती पूर्ण होण्याची शक्यता आहे. तसेच, तुमचा आत्मविश्वास खूप जास्त असल्या कारणाने तुम्ही कोणत्याही गोष्टीकडे सकारात्मक दृष्टीने पाहाल. थोरामोठ्यांचं चांगलं मार्गदर्शन लाभेल. मुलांच्या कलागुणांना चांगला विस्तार मिळेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :