Astrology Panchang Yog 30 April 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 30 एप्रिल म्हणजेच अक्षय्य तृतीयेचा (Akshaya Tritiya) दिवस आहे. आजच्या दिवशी वैशाख शुक्ल तृतीया आहे. त्यामुळे आजचा दिवस लक्ष्मी नारायणाला समर्पित आहे. तसेच, चंद्र आपल्या उच्च राशीत म्हणजेच वृषभ राशीत आहे. आजच्या दिवशी रोहिणी नक्षत्राबरोबरच गजकेसरी योगदेखील (Yog) जुळून आला आहे. त्याचबरोबर आज, सर्वार्थ सिद्धी, लक्ष्मी नारायण, शोभन  आणि रवि योगाचा शुभ संयोग जुळून आला आहे. 

Continues below advertisement


वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आजचा दिवस 5 राशींसाठी शुभ असणार आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात. 


वृषभ रास (Taurus Horoscope)


वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ असणार आहे. आजच्या दिवशी तुम्हाला नवीन उपक्रम हाती घेण्याची संधी मिळेल. तुमच्या करिअरला नवं वळण लागेल. तसेच, प्रगतीचे अनेक मार्ग तुमच्यासाठी खुले होतील. तुमच्या बौद्धिक विकासाला चालना मिळेल. तसेच, जोडीदाराचा तुम्हाला चांगला सपोर्ट मिळेल. कुटुंबात सुख-शांती नांदेल. 


मिथुन रास (Gemini Horoscope)


मिथुन राशीसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. तुमच्या मेहनतीला यश मिळेल. तसेच, तुम्ही जे कार्य हाती घ्याल त्यात तुम्हाला चांगलं यश मिळेल. नोकरदार वर्गातील लोकांना चांगलं प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. तसेच, तुमच्या पदोन्नतीत चांगली वाढ झालेली दिसेल. आज दिवसभरात तुम्हाला चांगली बातमी ऐकायला मिळेल. 


सिंह रास (Leo Horoscope)


सिंह राशीसाठी आजचा दिवस भाग्याचा असणार आहे. आज दिवसभरात तुम्हाला शुभवार्ता ऐकायला मिळेल. तसेच, लांबच्या प्रवासासाठी जाण्याचे शुभ योग जुळून येणार आहेत. धार्मिक यात्रेत तुम्ही सहभागी होऊ शकता. भौतिक सुख-संपत्तीचा चांगला लाभ तुम्हाला घेता येईल. तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. देवी लक्ष्मीचा तुमच्यावर आशीर्वाद असेल. 


धनु रास (Sagittarius Horoscope)


धनु राशीसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आज तुमच्या कलागुणांना चांगला वाव मिळेल. अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर तुम्ही एखाद्या नवीन वस्तूची खरेदी करु शकता. तुम्हाला मानसिक शांतता लाभेल. तुमच्या कुटुंबात आनंदी वातावरण पाहायला मिळेल. तसेच, तुमची लव्ह लाईफ चांगली असेल. 


मीन रास (Pisces Horoscope)


मीन राशीसाठी आजचा दिवस लाभदायक ठरणार आहे. या राशीच्या लोकांना नवीन गोष्टी शिकता येतील. तसेच, लवकरच यात्रेला जाण्याचा शुभ योग जुळून येणार आहे. जोडीदाराबरोबर तुमचा वेळ चांगला जाईल. तुमची रखडलेली कामे तुम्हाला पूर्ण करता येतील. तसेच, मित्रपरिवाराचा तुम्हाला चांगला सपोर्ट मिळेल. तुमचं संवादकौशल्य चांगलं असेल. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हे ही वाचा :


Horoscope Today 30 April 2025 : आज अक्षय्य तृतीयेच्या दिवशी 'या' 3 राशींवर असणार देवी लक्ष्मीचा आशीर्वाद; घरात लक्ष्मीच्या पावलांनी येणार पैसा, आजचे राशीभविष्य