Astrology Panchang Yog 3 May 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 3 मे म्हणजेच आजचा दिवस शनिवार आहे. हा दिवस शनीदेवाला समर्पित आहे. आज वैशाख शुक्ल पक्षातील षष्ठी उपरांत सप्तमी तिथी आहे. आज चंद्राने कर्क राशीत प्रवेश केला आहे. त्यामुळे नीचभंग राजयोग निर्माण झाला आहे. तसेच, आजच्या दिवशी त्रिपुष्कर योगसुद्धा जुळून आला आहे. त्यामुळे आजचा दिवस फार खास आहे. 

वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आजचा दिवस 5 राशींसाठी फार महत्त्वाचा असणार आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात. 

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीसाठी आजचा दिवस फार शुभ असणार आहे. तुम्हाला भौतिक सुख-संपत्तीचा लाभ घेता येईल. तसेच, जोडीदाराबरोबर तुमचा वेळ चांगला जाईल. एकमेकांच्या भावनांचा तुम्ही आदर कराल. आज तुमचं तुमच्या कामात मन रमेल. तसेच, मित्रांचा चांगला सहवास लाभेल. 

कर्क रास (Cancer Horoscope)

कर्क राशीसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. तुमच्या दिवसाची सुरुवात चांगली असेल. तसेच, तुमच्या आत्मविश्वासात चांगली वाढ होईल. उत्पन्नाचे नवे मार्ग तुमच्यासमोर खुले होतील. तुमच्या कुटुंबात आनंदी वातावरण पाहायला मिळेल. आज तुमची अनेक रखडलेली कामे पूर्ण करता येतील. 

कन्या रास (Virgo Horoscope)

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस भाग्याचा असणार आहे. आज तुम्हाला तुमची कामे पूर्ण करता येतील. तसेच, मुलांकडून तुम्हाला एखादी शुभवार्ता ऐकायला मिळेल. संध्याकाळचा वेळ धार्मिक कार्यात घालवाल. आज तुमच्यामध्ये समाधानी वृत्ती दिसून येईल. तसेच, समाजात तुम्हाला मान-सन्मान मिळेल. 

तूळ रास (Libra Horoscope)

तूळ राशीसाठी आजचा दिवस सौभाग्याचा असणार आहे. आज कामाच्या ठिकाणी उच्च अधिकाऱ्यांचा तुम्हाला सपोर्ट पाहायला मिळेल. तसेच, तुम्ही हाती घेतलेल्या कामात तुम्हाला यश मिळेल. त्यामुळे दिवसभर तुम्ही उत्साही असाल. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. 

मकर रास (Capricorn Horoscope)

मकर राशीसाठी आजचा दिवस लाभदायक असणार आहे. आज पार्टनरशिपमध्ये तुम्ही नवीन व्यवसायाची सुरुवात करु शकता. तसेच, तुम्हाला जोडीदाराचा देखील चांगला सपोर्ट मिळेल. प्रगतीचे अनेक मार्ग तुमच्यासमोर खुले होतील. जे विवाहित आहेत त्यांच्यासाठी आजचा दिवस फार शुभ असणार आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Horoscope Today 3 May 2025 : आज 'या' 3 राशींवर असणार शनीची वक्रदृष्टी; कोणताही निर्णय घेण्याआधी 10 वेळा विचार करा, आजचे राशीभविष्य