Astrology Panchang Yog 29 May 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 29 मे 2025 म्हणजेच आजचा दिवस गुरुवारचा आहे. आज दिवस खऱ्या अर्थाने देवी लक्ष्मीला समर्पित आहे. तसेच, दत्तगुरुंना देखील समर्पित आहे. आज चंद्राने मिथुन राशीत प्रवेश केला आहे. त्यामुळे गजकेसरी योगाचा शुभ संयोग जुळून आला आहे. तसेच, आजच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग, रवि योग नावाचा शुभ संयोग जुळून आला आहे. त्यामुळे आजचा दिवस फार खास असणार आहे.
वैदिक पंचांगानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा परिणाम 5 राशींच्या लोकांवर होणार आहे. या राशी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फार चांगला जाणार आहे. आज तुमच्या आत्मविश्वासात चांगली वाढ झालेली दिसेल. तसेच, तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळेल. कामाच्या ठिकाणी सगळ्यांबरोबर तुमचा ताळमेळ चांगला राहील. देवी लक्ष्मीची तुमच्यावर विशेष कृपा असणार आहे.
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आज तुमच्या बुद्धिमत्तेचा चांगला विकास होईल. तसेच, तुमच्या आजूबाजूला परिस्थिती फार अनुकूल असणार आहे. तुमच्या कुटुंबात सुख शांती नांदेल. तसेच, जवळच्या नातेवाईकांबरोबर भेटीगाठी होतील.
तूळ रास (Libra Horoscope)
तूळ राशीसाठी आजचा दिवस फार भाग्यशाली असणार आहे. तुमचं धार्मिक कार्यात मन रमेल. लवकरच प्रवासाचे योग दिसून येत आहेत. कामाच्या ठिकाणी तुम्हाला चांगला लाभ मिळेल. तसेच, तुमच्या मार्गातील सर्व अडचणी दूर होतील. त्यामुळे तुम्हाला कसलीच चिंता करण्याची गरज नाही.
धनु रास (Sagittarius Horoscope)
धनु राशीसाठी आजचा दिवस फार खास असणार आहे. आज तुमच्या करिअरला वेगळं वळण लागेल. तसेच, पार्टनरबरोबर तुमचा ताळमेळ चांगला राहील. तुमच्या कामकाजात तुम्हाला चांगले परिणाम पाहायला मिळतील. तसेच, तुमच्या घरात आनंदाचं वातावरण निर्माण होईल.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ राशीसाठी आजचा दिवस फार लाभदायक असणार आहे. आज तुमची अनेक दिवसांपासून तुमची रखडलेली कामे तुम्हाला पूर्ण करता येतील. तसेच, शेअर बाजाराशी संबंधित तुम्हाला चांगला लाभ मिळेल. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना चांगला वाव मिळेल. नातेवाईकांबरोबर चांगले संबंध निर्माण होतील.
हेही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)