Astrology Panchang Yog 27 February 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 27 फेब्रुवारीचा दिवस म्हणजेच गुरुवारचा दिवस आहे. आज दत्तगुरुंचा दिवस आहे. तसेच, आज फाल्गुन अमावस्या देखील आहे. त्यामुळे आजचा दिवस महत्त्वाचा असणार आहे. आजच्या दिवशी चंद्राचं संक्रमण होऊन शिव आणि सिद्धी योगासह (Yog) अनेक शुभ योग जुळून आले आहेत. याचा अनेक राशींना चांगला लाभ मिळणार आहे. या काळात भगवान विष्णूची देखील तुमच्यावर कृपा असेल.
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ 5 राशींना मिळणार आहे. या राशी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आज तुम्ही आर्थिक योजनांचा चांगला लाभ घेऊ शकता. तसेचत, तुमच्या गुंतवणुकीतून चांगली कमाई करु शकता. कामाच्या ठिकाणी तुम्हाला प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. तसेच, लवकरच तुमच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. आज अकाऊंट आणि सेल्स डिपार्टमेंटमध्ये काम करणाऱ्या लोकांना चांगला लाभ मिळेल.
वृषभ रास (Taurus Horoscope)
वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस भाग्याचा असणार आहे. नोकरदार वर्गातील लोकांना नशिबाची चांगली साथ मिळेल. तसेच, कामाच्या ठिकाणी तुमचं कौतुक केलं जाईल. लवकरच तुमचं प्रमोशन देखील होण्याची शक्यता आहे. तसेच, आजच्या दिवशी तुम्हाला अनपेक्षित धनलाभ मिळेल. त्यामुळे तुम्ही फार आनंदी असाल. तुमच्या व्यवसायाचा देखील विस्तार वाढलेला दिसेल.
कर्क रास (Cancer Horoscope)
कर्क राशीच्या लोकांना आज अनपेक्षित धनलाभ मिळण्याची शक्यता आहे. तसेच, तुमच्यासाठी उत्पन्नाचे अनेक मार्ग मोकळे होतील. आज कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांचा तुम्हाला चांगला पाठिंबा मिळेल. राजकारणात तुम्ही सक्रिय असाल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आज तुमच्यातील कलागुणांना चांगला वाव मिळेल.
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस भाग्याचा असणार आहे. आज जर तुम्ही एखाद्या नवीन कार्याची सुरुवात केली तर त्यातून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. तसेच, तुमच्या वैवाहिक जीवनात आनंद टिकून राहील. आज संध्याकाळी तुमच्या घरी पाहुणे येण्याची शक्यता आहे. तसेच, मित्रांच्या साथीने तुमच्या अनेक योजना पूर्ण होतील. आरोग्याच्या बाबतीत सतर्क राहा.
मकर रास (Capricorn Horoscope)
मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक असणार आहे. आज तुम्हाला उत्पन्न वाढवण्याच्या अनेक संधी मिळतील. तसचे, आज दिवसभरात तुम्हाला एखादी चांगली शुभवार्ता ऐकायला मिळेल. अनेक दिवसांपासून रखडलेले तुमचे काम आज पूर्ण होण्याची शक्यता आहे. आज तुम्ही केलेल्या गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. जे लोक अनेक दिवसांपासून आजारी आहेत त्यांची तब्यत सुधारेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: