Astrology Panchang Yog 24 May 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 24 मे म्हणजेच आजचा दिवस शनिवार, आजचा दिवस हा शनिदेवाला (Shani Dev) समर्पित आहे. आज चंद्राने मीन राशीत प्रवेश केला आहे. त्यामुळे परिवर्तन योग जुळून आला आहे. त्याचबरोबर, आज आयुष्मान योग (Yog) आणि सौभाग्य योगाचा शुभ संयोग जुळून आला आहे. त्यामुळे आजचा दिवस फार खास असणार आहे. आजच्या शुभ योगामुळे अनेक राशींना चांगला लाभ मिळणार आहे. शनीदेवाचा आशीर्वाद मिळणार आहे. 

वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ 5 राशींच्या लोकांना होणार आहे. या राशी नेमक्या कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात. 

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीसाठी आजचा दिवस फार लाभदायक असणार आहे. आज तुमच्या व्यवसायाची सुरुवात चांगली होईल. त्यामुळे तुम्हाला प्रोत्साहन मिळेल. तसेच, भौतिक सुख-सुविधांचा तुम्ही लाभ घ्याल. जे तरुण नोकरीच्या शोधात आहेत त्यांना लवकरच चांगला जॉब मिळेल. तसेच, मनोरंजन क्षेत्राशी संबंधित लोकांना आजच्या दिवसाचा फायदा मिळेल. कुटुंबात वातावरण अनुकूल असेल. 

कर्क रास (Cancer Horoscope)

कर्क राशीसाठी आजचा दिवस फार भाग्यशाली असणार आहे. आज तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी चांगलं वातावरण अनुभवायला मिळेल. तसेच, समाजात तुमचं एक वेगळं प्रभुत्व निर्माण होईल. मित्र-मैत्रीणींचा तुम्हाला चांगला सपोर्ट मिळेल. तसेच, पैशांची गुंतवणूक करण्यातही तुम्हाला यश मिळेल. भविष्यात चांगल्या संधी चालून येतील. 

सिंह रास (Leo Horoscope)

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फार कास असणार आहे. तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल. तसेच, आज तुम्हाला अचानक धनलाभही होऊ शकतो. जोडीदाराच्या मदतीने तुम्हाला अनेक गोष्टी साध्य करता येतील. तुम्ही नवीन व्यवसायाची सुरुवात देखील करु शकता. आज घरात पाहुणे येण्याची शक्यता आहे. 

तूळ रास (Libra Horoscope)

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फार लाभदायी असणार आहे. तुम्ही पार्टनरशिपमध्ये नवीन व्यवसायाची सुरुवात करु शकता. तसेच, तुम्हाला बिझनेसमध्ये काही चढ-उतारांचा सामना करावा लागू शकतो. आज तुम्हाला काही नवीन गोष्टी शिकता येतील. त्यामुळे तुमच्यातील कलागुणांना चांगला वाव मिळेल. तसेच, आरोग्य देखील उत्तम राहील. 

मकर रास (Capricorn Horoscope)

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फार चांगला असणार आहे. आज तुम्ही नियोजित केलेली कामे तुम्हाला वेळेत पूर्ण करता येतील. तसेच, कामाच्या ठिकाणी सकारात्मक वातावरण निर्माण होईल. वातावरणात बदल जाणवेल. त्यामुळे आरोग्याची विशेष काळजी घ्या. जे लोक जाहिरात क्षेत्राशी संबंधित आहेत त्यांना दिवसाच्या अंती चांगला लाभ मिळेल. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

हेही वाचा :

Horoscope Today 24 May 2025 : आज शनिवारच्या दिवशी 'या' 5 राशींवर खुश होणार शनि महाराज; रोग, पिडा, दारिद्र्य होणार दूर, आजचे राशीभविष्य