Astrology : आज मालव्य राजयोगासह जुळून आले अनेक शुभ संयोग; धनुसह 'या' 5 राशींना मिळणार धनलाभ, संपत्तीत होणार दुप्पट वाढ
Astrology Panchang Yog 23 July 2025 : वैदिक शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ 5 राशींना मिळणार आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.

Astrology Panchang Yog 23 July 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 23 जुलै 2025 चा दिवस आहे. आजचा वार बुधवार आहे. तसेच, आज चंद्राने मिथुन राशीत प्रवेश केला आहे. त्याचबरोबर आज मालव्य राजयोगासह (Yog) अनेक शुभ संयोग जुळून आले आहेत. तसेच, आजच्या दिवशी आर्द्रा नक्षत्रासह हर्ष योगाचा शुभ संयोग जुळून आला आहे. त्यामुळे आजचा दिवस फार खास असणार आहे.
वैदिक शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ 5 राशींना मिळणार आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीसाठी आजचा दिवस फार खास असणार आहे. आज तुमच्या गणेशाची विशेष कृपा असणार आहे. त्यामुळे तुमच्या मार्गातील अडथळे दूर होतील. तसेच, कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचा तुम्हाला चांगला पाठिंबा मिळणार आहे. नवीन सहकाऱ्यांबरोबर चांगली ओळख होईल. तसेच, आजच्या दिवशी तुमचं उत्तम संवादकौशल्य दिसून येईल. कुटुंबात आनंदी वातावरण पाहायला मिळेल.
कर्क रास (Cancer Horoscope)
कर्क राशीसाठी आजचा दिवस फार खास असणार आहे. आज दिवसभरात तुम्हाला एखादी शुभवार्ता मिळेल. तसेच, तुमच्या करिअरमध्ये तुमची चांगली प्रगती दिसून येईल. तुमची आर्थिक स्थिती चांगली असणार आहे. त्याचबरोबर, नोकरदार वर्गातील लोकांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. मित्रांचा चांगला सहवास लाभेल.
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीसाठी आजचा दिवस भाग्यशाली असणार आहे. या काळात तुमच्यासाठी उत्पन्नाचे अनेक मार्ग खुले होतील. तसेच, जुन्या मित्रांबरोबर भेटीगाठी होतील. भावा बहिणींबरोबर चांगले संबंध निर्माण होतील. तुमच्या भौतिक सुख संपत्तीत चांगली वाढ झालेली दिसेल. तुमचं मन प्रसन्न राहील. गणरायाची तुमच्यावर विशेष कृपा असणार आहे.
धनु रास (Saggitarius Horoscope)
धनु राशीसाठी आजचा दिवस फार शुभ असणार आहे. आज तुमच्या मार्गातील सगळे अडथळे दूर होतील. पार्टनरशिपमध्ये तुम्ही नवीन व्यवसायाची सुरुवात करु शकता. तसेच, तुमचा आत्मविश्वास वाढलेला दिसेल. एकूणच आजचा दिवस तुमच्यासाठी फार अनुकूल असणार आहे. बिझनेसमध्ये तुमची चांगली प्रगती झालेली दिसेल.
मीन रास (Pisces Horoscope)
मीन राशीसाठी आजचा दिवस फार खास असणार आहे. तुम्हाला अतिरिक्त लाभ मिळण्याची शक्यता आहे. तसेच, तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल. नवीन योजनांचा तुम्ही लाभ घ्याल. वैवाहिक जीवन आनंदी राहील. तसेच, तरुणांसाठी नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होतील. धार्मिक कार्यात तुमचं मन रमेल.
हे ही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)















