Astrology Panchang Yog 20 June 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 20 जूनचा दिवस म्हणजेच आजचा वार शुक्रवार. आजचा दिवस देवी लक्ष्मीसाठी समर्पित आहे. तसेच, आज षडाष्टक योगदेखील निर्माण झाला आहे. त्यामुळे आजचा दिवस फार महत्त्वाचा असणार आहे. आज चंद्राने मीन राशीतून मेष राशीत प्रवेश केला आहे. तसेच, आजच्या दिवशी कलानिधी योगाचा शुभ संयोग निर्माण झाला आहे. त्यामुळे आजचा दिवस फार खास असणार आहे. 

वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ 5 राशींना मिळणार आहे. या राशी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात. 

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अत्यंत शुभ असणार आहे. आज देवी लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होऊन धनलाभ देईल. तसेच, आज दिवसभरात तुम्हाला एखादी शुभवार्ता ऐकायला मिळेल. समाजात तुम्हाला चांगला मान-सन्मान मिळेल. धार्मिकतेच्या दृष्टीने तुमचा कल थोडा जास्त असेल. त्यामुळे पूजा पाठ करण्यात तुम्ही व्यस्त असाल. 

कर्क रास (Cancer Horoscope)

कर्क राशीसाठी आजचा दिवस भाग्याचा असणार आहे. आज कामाच्या ठिकाणी तुम्हाला सहकाऱ्यांचा चांगला पाठिंबा मिळेल. तसेच, भौतिक सुख सुविधांचा तुम्ही लाभ घ्याल. जर तुम्हाला यात्रेला जायचं असेल तर त्यासाठी दिवस अनुकूल आहे. मात्र, काळजी घेणंदेखील तितकंच गरजेचं आहे. जोडीदाराबरोबर चांगले संबंध निर्माण होतील. 

तूळ रास (Libra Horoscope)

तूळ राशीसाठी आजचा दिवस नवीन उमेदीचा असणार आहे. आज तुम्हाला तुमच्या कामात सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील. तसेच, कामाच्या निमित्ताने तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो. निर्णय घेण्याची तुमची वृत्ती दिसून येईल. तसेच, आत्मविश्वासही वाढेल. तुमच्या कुटुंबात आनंदी वातावरण पाहायला मिळेल. 

मकर रास (Capricorn Horoscope)

मकर राशीसाठी आजचा दिवस शुभ असणार आहे. आज तुमच्या व्यवसायाचा विस्तार देखील वाढलेला दिसेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या बॉसकडून तुमच्या कामाचं कौतुक केलं जाईल. तसेच, तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहील. घरात आनंदी वातावरण पाहायला मिळेल. 

मीन रास (Pisces Horoscope)

मीन राशीसाठी आजचा दिवस खास असणार आहे. तुमच्या बुद्धिमत्तेला चांगला कस लागेल. तसेच, मुलांच्या कलात्मकतेला चांगला वाव मिळेल. तुमच्या व्यवसायाला नवीन उभारी मिळेल. नवीन ऑर्डर्स येतील. तसेच, वैवाहिक जीवनातील वाद हळुहळू  दूर होताना दिसतील. एकूणच आजचा दिवस आनंदात जाईल. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

हेही वाचा :    

Horoscope Today 20 June 2025 : आज 'या' 5 राशींच्या भक्तांवर देवी लक्ष्मी होणार प्रसन्न; घरात लक्ष्मीच्या पावलांनी येणार पैसा, आजचे राशीभविष्य