Astrology Panchang Yog 20 April 2025 : आज 20 एप्रिल म्हणजेच रविवारचा दिवस आहे. आज गजकेसरी राजयोग निर्माण होणार आहे. तसेच, तूळ राशीत मंगळ दृष्ट असल्या कारणाने आज धन योग (Yog) जुळून आला आहे. तसेच, आज ज्या शुभ राशी असतील त्यांच्यावर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद असणार आहे. त्यामुळे या लकी राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात.
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 5 राशींच्या लोकांना चांगला लाभ मिळणार आहे. या राशींना कोणता लाभ मिळेल आणि या लकी राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीच्या लोकांसाठी आजचा रविवारचा दिवस फार शुभकारक असणार आहे. आज तुम्ही जी काही रखडलेली कामे आहेत ती पूर्ण करुन घ्याल. तसेच, सुट्टीचा दिवस असल्या कारणाने घरात पाहुणे देखील येऊ शकता. अशा वेळी त्यांचं योग्य आदरातिथ्य करा. काही नवीन प्रोजेक्ट्सवर काम करण्याची संधी मिळेल. यासाठी कामातील ज्येष्ठ व्यक्तींकडून तुमची विचारणा होईल.
कर्क रास (Cancer Horoscope)
कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभकारक असणार आहे. आज कामाच्या ठिकाणी तुमच्यावर नवीन जबाबदाऱ्या सोपवण्यात येऊ शकतात. अशा वेळी त्या योग्य आणि प्रामाणिकपणे पार पाडा. तसेच, तुमच्या उत्पन्नात देखील वाढ होण्याची शक्यता आहे. तुमचा व्यवसाय अगदी सुरळीत चालेल. नवीन ऑर्डर्स मिळतील. त्यामुळे तुम्हाला चिंता भासणार नाही.
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस भाग्याचा असणार आहे. आज तुम्ही तुमच्या कामात सक्रिय असाल. तसेच, समाजातील विविध घटकांतील व्यक्तींशी तुम्हाला भेटता येईल. त्यामुळे छान संवाद साधता येईल. नवीन गोष्टींची माहिती मिळेल. समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल. तुम्ही केलेल्या कामाचं कौतुक केलं जाईल.
तूळ रास (Libra Horoscope)
तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. जोडीदाराबरोबर आज तुम्हाला चांगला संवाद साधता येईल. तसेच, तुमच्या कुटुंबात आनंदी वातावरण पाहायला मिळेल. आज तुम्हाला एकच सल्ला देण्यात येतोय तो म्हणजे कोणाला उद्धट बोलू नका. रागावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. आणि नातेसंबंधांना जपा.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस भाग्याचा असणार आहे. आज नशिबाची साथ तुमच्याबरोबर असेल. तसेच, तुम्ही हाती घेतलेल्या कार्याला तुम्हाला चांगलं यश मिळे. देवी लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल त्यामुळे तुम्ही जे काही कार्य हाती घ्याल त्यात कोणताच अडथळा येणार नाही. मित्रांचा सहवास चांगला लाभेल.