Astrology Panchang Yog 2 April 2025 : आज 2 एप्रिल म्हणजेच बुधवारचा दिवस आहे. आज बुध ग्रहाने मीन राशीत प्रवेश केला असल्याने आजच्या दिवशी बुधादित्य योग (Yog) जुळून आला आहे. तसेच, आजच्या दिवशी चैत्र नवरात्रीची पंचमी तिथी आहे. त्यामुळे आजचा दिवस फार खास असणार आहे. आज अनेक ग्रहांच्या आणि नक्षत्रांच्या हालचालीत बदल दिसून येत असल्याने आज गौरी योगाचा देखील शुभ संयोग जुळून आला आहे. आजच्या भाग्यवान राशींच्या नोकरीत चांगले परिणाम दिसून येतील. तसेच, आर्थिक बाबतीत तुम्ही सक्षम असाल. 

वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ नेमका कोणत्या राशींना मिळतो ते जाणून घेऊयात. 

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फार भाग्यशाली ठरणार आहे. आज तुमचं एखादं महत्त्वाचं काम वेळेत पूर्ण होईल. तुम्हाला मिळालेल्या नोकरीतून तुम्हाला चांगलं उत्पन्न मिळेल. तसेच, कामाच्या ठिकाणी देखील सहकाऱ्यांचा तुम्हाला मदतीचा हात मिळेल. आज तुम्ही एखादी महत्त्वाची डील देखील करु शकता. तुम्हाला नवीन कामाच्या ऑर्डर्स मिळतील. 

मिथुन रास (Gemini Horoscope)

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक ठरणार आहे. आज तुम्हाला अप्रत्यक्षपणे लाभ मिळेल. तसेच, जर तुम्हाला एखाद्या नवीन बिझनेसची सुरुवात करायची असल्यास आजचा दिवस तुमच्यासाठी फार शुभ असणार आहे. आज कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांबरोबर तुमचा चांगला ताळमेळ दिसून येईल. दिवसभरात तुम्हाला एखादी शुभवार्ता ऐकायला मिळेल. 

सिंह रास (Leo Horoscope)

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. आज ऑफिसमध्ये तुमच्या बॉसकडून तुमचं कौतुक केलं जाईल. तसेच, आज तुमच्यावर नवीन जबाबदाऱ्या देखील सोपवण्यात येणार आहेत. त्यामुळे आजचा दिवस आळस करु नका. कामाकडे नीट लक्ष द्या. आज संध्याकाळच्या वेळेला तुमची तुमच्या मित्रांबरोबर गाठीभेटी होतील. त्यांना भेटून तुमचं मन प्रसन्न होईल. 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस भाग्यशाली असणार आहे. आज तुमचे अनेक दिवसांपासून रखडलेले काम पूर्ण होईल. तसेच, जर तुम्ही नवीन नोकरीच्या शोधात असाल तर तुम्हाला लवकरच चांगली नोकरी मिळले. आज आर्थिक बाबतीत तुम्ही सक्षम असाल. लक्ष्मी पंचमी असल्या कारणाने देवी लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न असणार आहे. 

कुंभ रास (Aquarius Horoscope)

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी असणार आहे. आज तुम्हाला दिवसभरात एखादी शुभवार्ता ऐकायला मिळू शकते. तसेच, तुम्हाला भौतिक सुख-सुविधांचा चांगला लाभ घेता येईल. वैवाहिक जीवनात आनंद टिकून राहील. तसेच, जर तुम्हाला नवीन वाहन किंवा प्रॉपर्टी खरेदी करायची असेल तर त्यासाठी आजचा दिवस फार खास असणार आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:  

Weekly Horoscope : मेष आणि वृषभ राशींसाठी एप्रिलचा पहिला आठवडा घेऊन येणार मोठी संधी; वाचा साप्ताहिक राशीभविष्य