Astrology : आज इंद्र योगासह जुळून आले अनेक शुभ संयोग; कर्कसह या' 4 राशींना भरभरुन मिळणार देवीचा आशीर्वाद, लवकरच लागणार लॉटरी
Astrology Panchang Yog 19 October 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आजच्या शुभ राशींवर देवी लक्ष्मीची कृपा असणार आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.

Astrology Panchang Yog 19 October 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 19 ऑक्टोबर 2025 चा दिवस आहे. आज चंद्राने कर्क राशीत प्रवेश केला आहे. तसेच, शुक्राच्या युतीने कलानिधी योग जुळून येणार आहे. त्याचबरोबर, ग्रहांच्या युतीने त्रिग्रही योग आणि बुधादित्य योग जुळून येणार आहे. तसेच, आजच्या दिवशी इंद्र योग आणि सर्वार्थ सिद्धी योगदेखील जुळून आला आहे. त्यामुळे आजचा दिवस फार शुभ असणार आहे.
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आजच्या शुभ राशींवर देवी लक्ष्मीची कृपा असणार आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
वृषभ रास (Taurus Horoscope)
वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फार खास असणार आहे. तसेच, आजच्या दिवशी तुमच्या कार्यक्षेत्रात चांगली प्रगती दिसून येईल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांचा तुम्हाला सपोर्ट मिळेल. तसेच, नशिबाची साथ तुमच्याबरोबर असेल. नवीन वस्तूंची खरेदी तुम्ही करुन घ्याल. तुमची लव्ह लाईफ चांगली असेल.
कर्क रास (Cancer Horoscope)
कर्क राशीसाठी आजचा दिवस लाभदायक असणार आहे. तुम्हाला भौतिक सुख सुविधांचा चांगला लाभ मिळेल.तसेच, जोडीदाराबरोबर तुमचा व्यवहार चांगला असेल. नवीन व्यवसायात प्रगतीचे संकेत जुळून येत आहेत. तुमचं वैवाहिक जीवन सुरळीत चालेल. नोकरीत तुम्हाला प्रमोशन मिळण्याची संधी आहे.
कन्या रास (Virgo Horoscope)
कन्या राशीच्या लोकांवर आज देवी लक्ष्मीची विशेष कृपा असणार आहे. तुमच्यातील कलागुणांना चांगला वाव मिळेल. तसेच, तुमच्या कुटुंबात आनंदी वातावरण निर्माण होईल. तसेच, मित्रांच्या सहयोगाने तुम्हाला चांगला लाभ मिळेल. जर तुम्हाला नोकरीत बदल करायचे असतील तर ही चांगली वेळ आहे.
मकर रास (Capricorn Horoscope)
मकर राशीसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. जर तुम्हाला नवीन कार्याची सुरुवात करायची असेल तर त्यासाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. तसेच, जर तुम्हाला नवीन घर किंवा प्रॉपर्टी विकत घ्यायची असेल तर तुम्ही या काळात घेऊ शकता. गुंतवणुकीसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे.
हेही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)



















