Astrology Panchang Yog 19 June 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 19 जूनचा दिवस म्हणजेच आजचा वार गुरुवार आहे. आजचा दिवस हा दत्तगुरु आणि भगवान विष्णू यांना समर्पित आहे. तसेच, आज चंद्राने मीन राशीत प्रवेश केला आहे. त्यामुळे आजचा दिवस महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर, आजच्या दिवशी गजकेसरी योग (Yog) आणि अनुपम संयोग जुळून आला आहे. त्यामुळे काही राशींसाठी हा काळ सुवर्ण भाग्याचा असणार आहे. आजच्या लकी राशींना कुटुंबात चांगलं वातावरण मिळेल. तसेच, तुमच्या व्यवसायाची प्रगती होईल.
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ 5 राशींना होणार आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
वृषभ रास (Taurus Horoscope)
वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आज तुमच्या धनसंपत्तीत किंचित वाढ झालेली दिसेल. तसेच, भौतिक सुख-शांतीचा लाभ तुम्हाला मिळेल. आज कामाच्या व्यतिरिक्त अतिरिक्त कोणाशी संबंध किंवा व्यवहार ठेवू नका. तुमच्या कामात भगवान विष्णू तुमच्या पाठीशी असतील.
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सकारात्मकतेचा असणार आहे. आज तुमच्या कामात तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळेल. तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतील. फक्त घराबाहेर पडताना काळजी घ्या. पावसाचं वातावरण आहे. मानसिक तणाव दूर होईल. तसेच, क्रियाशील गोष्टी कराल.
कन्या रास (Virgo Horoscope)
कन्या राशीसाठी आजचा दिवस शुभ असणार आहे. जर तुम्हाला एखाद्या नवीन कार्याची सुरुवात करायची असेल तर त्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. तुम्ही पैशांची गुंतवणूक देखील करु शकता. मात्र, घरातील ज्येष्ठ व्यक्तींचं मत विचारात घ्या. मित्रांचा देखील चांगला सपोर्ट मिळेल.
धनु रास (Sagittarius Horoscope)
धनु राशीसाठी आजचा दिवस फार खास असणार आहे. आज कामाच्या निमित्ताने तुम्हाला घराबाहेर पडावं लागू शकतं. अशा वेळी प्रवास सांभाळून करा. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली असेल. त्यामुळे कोणत्याही गोष्टीत तडजोड करु नका. जर तुम्हाला नवीन वाहन घ्यायचं असेल तर त्यासाठी आजचा दिवस शुभ आहे.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फार भाग्यशाली असणार आहे. आज विविध संसाधनांचा तुम्हाला लाभ घेता येईल. तसेच, व्यवसायाचा देखील विस्तार वाढलेला दिसेल. आज रखडलेले पैसे तुम्हाला पुन्हा मिळण्याची शक्यता आहे. घरगुती कामात हातभार लावावा. ज्येष्ठ व्यक्तींचं पुण्य मिळेल. सकारात्मक विचार करा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :