Astrology Panchang Yog 17 February 2025: आज 17 फेब्रुवारीचा दिवस म्हणजेच सोमवारचा (Monday) दिवस आहे. तसेच, आजच्या दिवसाचं महत्त्व फार वाढलं आहे. 17 फेब्रुवारी 2025 आज माघ महिन्यातील कृष्ण पक्ष पंचमी तिथी आहे. या तारखेला चंद्र कन्या राशीत असेल. कारण आजच्या दिवशी शूल योगाचा (Yog) देखील शुभ संयोग जुळून आला आहे. त्यामुळे आजच्या दिवसाचं महत्त्व फार वाढलं आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आजचा शुभ मुहूर्त आणि राहुकालची वेळ, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ 5 राशींच्या लोकांना होणार आहे. या राशी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात. 


चित्रा नक्षत्र आणि शूल योगाचा योगायोग


पंचागानुसार, 17 फेब्रुवारी 202 ही माघ महिन्यातील कृष्ण पक्षाची पाचवी तिथी आहे. या तिथीला चित्रा नक्षत्र आणि शूल योगाचा योगायोग असेल. दिवसाच्या शुभ मुहूर्ताबद्दल सांगायचे तर, अभिजीत मुहूर्त सोमवारी दुपारी 12:09 ते 12:54 पर्यंत असेल. राहुकाल 08:21 ते 09:44 मिनिटांपर्यंत आहे. कन्या राशीत चंद्राचे भ्रमण होईल


आज जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ 5 राशींच्या लोकांना होणार!


17 फेब्रुवारी हा दिवस काही राशींसाठी खूप खास असणार आहे. या दिवशी तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल आणि यशाचे नवे मार्ग खुले होतील. आर्थिक लाभ, करिअरमध्ये प्रगती आणि आनंद मिळण्याची शक्यता आहे. जर तुमची राशीचा देखील या यादीत समावेश असेल तर हा दिवस तुमच्यासाठी खूप शुभ आहे. चला जाणून घेऊया त्या 5 भाग्यशाली राशींबद्दल, ज्यांचे भाग्य 17 फेब्रुवारीला चमकणार आहे.


सिंह


सिंह राशीच्या लोकांसाठी 17 फेब्रुवारी हा दिवस खूप खास असेल. जर तुम्ही एखाद्या मोठ्या प्रकल्पावर काम करत असाल तर या दिवशी यश मिळण्याची शक्यता आहे. नोकरदारांना पदोन्नती किंवा पगारवाढीची चांगली बातमी मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांसाठीही हा दिवस लाभदायक ठरेल. कुटुंबात एखादी चांगली बातमी मिळू शकते, ज्यामुळे मन प्रसन्न राहील. तुम्ही आत्मविश्वास आणि उर्जेने परिपूर्ण असाल, ज्यामुळे तुमचे काम वेगाने पूर्ण होईल.


वृश्चिक


वृश्चिक राशीच्या लोकांसाठी 17 फेब्रुवारी हा दिवस आर्थिक दृष्टीकोनातून खूप चांगला असणार आहे. प्रलंबित पैसे मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर हा दिवस तुमच्यासाठी शुभ राहील. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील आणि घरात काही धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन होण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीसाठी ही योग्य वेळ आहे, कारण भविष्यात चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे.


धनु


धनु राशीच्या लोकांसाठी हा दिवस खूप भाग्यवान असेल. नशीब तुमची साथ देईल आणि तुम्हाला मोठी संधी मिळू शकेल. तुम्ही कोणत्याही परीक्षेची किंवा मुलाखतीची तयारी करत असाल तर या दिवशी यश मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना अचानक मोठा फायदा होऊ शकतो. जुन्या गुंतवणुकीतूनही चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबात काही चांगली बातमी येऊ शकते, ज्यामुळे मनात आनंद आणि उत्साह राहील.


कुंभ


कुंभ राशीच्या लोकांसाठी 17 फेब्रुवारी हा दिवस नवीन सुरुवात करण्यासाठी खूप चांगला असेल. तुम्हाला नवीन व्यवसाय किंवा प्रकल्प सुरू करायचा असेल तर हा काळ तुमच्यासाठी अनुकूल असेल. अडकलेले पैसे परत मिळू शकतील आणि आर्थिक स्थिती मजबूत होईल. तुम्हाला तुमच्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल आणि समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल. घरात सुख-शांतीचे वातावरण असेल आणि तुम्हाला कुटुंबातील सदस्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल.


मीन


17 फेब्रुवारी हा मीन राशीच्या लोकांसाठी खूप चांगला दिवस आहे. एक मोठे स्वप्न पूर्ण करण्याची वेळ आली आहे. तुम्ही सहलीचे नियोजन करत असाल तर ही सहल फायदेशीर ठरेल. तुम्हाला कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात, ज्यामुळे करिअरमध्ये प्रगती होईल. आरोग्याच्या दृष्टीकोनातूनही आजचा दिवस चांगला राहील आणि तुम्हाला उर्जेने परिपूर्ण वाटेल. नात्यात गोडवा येईल आणि तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल.


हिंदू पंचांगाचे महत्त्व


हिंदू पंचांगद्वारे वेळ आणि कालावधीची अचूक गणना केली जाते. पंचांग हे प्रामुख्याने पाच भागांचे बनलेले असते. हे पाच भाग म्हणजे तिथी, नक्षत्र, वार, योग आणि करण. येथे आम्ही तुम्हाला दैनिक पंचांगमध्ये शुभ काळ, राहुकाल, सूर्योदय आणि सूर्यास्ताची वेळ, तिथी, करण, नक्षत्र, सूर्य आणि चंद्र ग्रहांची स्थिती, हिंदू महिना आणि पक्ष इत्यादींची माहिती देण्यात येत आहे. 


हेही वाचा :         


Horoscope Today 17 February 2025 :आज सोमवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? भगवान शंकराची कृपा कोणावर? आजचे राशीभविष्य वाचा 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)