Astrology Panchang Yog 17 February 2025 : आज 17 फेब्रुवारी म्हणजेच आठवड्याचा पहिला दिवस सोमवार. आजच्या दिवशी पंचमी तिथीचा शुभ संयोग (Yog) आहे. तसेच, आजच्या दिवशी धन योग आणि मालव्य राजयोगाचा शुभ संयोग जुळून आला आहे. त्यामुळे आजच्या दिवसाचं महत्त्व फार वाढलं आहे. आज ज्या राशींच्या लोकांना शुभ लाभ मिळणार आहे त्यांची आर्थिक बाजू मजबूत असेल. तसेच, तुमच्या भगवान शंकराची कृपा असणरा आहे. त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आजच्या दिवसाचा लाभ 5 राशींना मिळणार आहे. या राशी (Zodiac Signs) कोणत्या ते जाणून घेऊयात. 

वृषभ रास (Taurus Horoscope)

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस मंगलमय असणार आहे. आजच्या दिवसात तुमची सर्व कामे मार्गी लागतील. तसेच, कामाच्या ठिकाणी तुमची चांगली प्रगती दिसून येईल. तुमच्या कामाचं कौतुक केलं जाईल. तसेच, आज तुम्ही जर तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवलं तर लवकरच तुम्हाला चांगली शुभवार्ता मिळेल. मार्केटिंग क्षेत्रातील लोकांना आजचा दिवस चांगला जाणार आहे. 

कर्क रास (Cancer Horoscope)

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस भाग्याचा असणार आहे. आज तुमच्या सुख-समृद्धीत चांगली वाढ झालेली दिसेल. तसेच, सामाजिक कार्यात तुम्ही जास्त सक्रिय असाल. नोकरदार वर्गातील लोकांसाठी हा काळ फार चांगला असणार आहे. कामाच्या ठिकाणी महिला सहकाऱ्यांचा देखील तितकाच पाठिंबा पाहायला मिळणार आहे. मित्रांच्या सहकार्याने तुम्ही अनेक कामे पूर्ण करु शकाल. त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही. 

तूळ रास (Libra Horoscope)

तूळ राशीच्या लोकांसाठी आठवड्याचा पहिला दिवस फार चांगला जाणार आहे. आज तुम्ही जास्त भावनिकतेने विचार कराल. मात्र, याचा तुम्हाला तोटादेखील होऊ शकतो. त्यामुळे माणसं ओळखायला शिका. तसेच, तुमच्यातील कलागुणांना आज चांगला वाव मिळेल. तुमच्या कुटुंबात आनंदी वातावरण असेल. सुख-समृद्धीत नांदाल. तसेच, धार्मिक कार्यात आपलं मन रमवाल. 

धनु रास (Sagittarius Horoscope)

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस धनवान असणार आहे. आज विविध स्त्रोतांमधून तुम्हाला पैसा मिळेल. तसेच, अनेक दिवसांपासून रखडलेले तुमचे पैसे तुम्हाला परत मिळतील. तुमच्या आजूबाजूला आनंदी वातावरण पाहायला मिळणार आहे. तसेच, कामाच्या ठिकाणी तुमच्यावर नवीन जबाबदाऱ्या सोपवण्यात येतील. त्या तुम्ही प्रामाणिकपणे पार पाडणं गरजेचं आहे. आरोग्याची काळजी करण्याची गरज नाही. 

मकर रास (Capricorn Horoscope)

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस भाग्याचा असणार आहे. आज तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. तसेच, मित्रांचा देखील तुम्हाला चांगला सहवास मिळेल. आर्थिक बाबतीत बोलायचं झाल्यास, धनदेवता तुमच्यावर प्रसन्न होणार आहे. एकूणच तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला आज मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही फार खुश असाल. गरजूंना मदत करण्यासाठी तुम्ही नेहमी तत्पर असाल. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

हेही वाचा :   

Weekly Horoscope : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी नवीन आठवडा कसा असणार? वाचा साप्ताहिक राशीभविष्य