Astrology Panchang Yog 15 June 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 15 जून म्हणजेच रविवारचा दिवस. आजचा दिवस सूर्यदेवाला समर्पित आहे. आज सूर्याचं संक्रमण होऊन त्रिग्रही राजयोग देखील निर्माण झाला आहे. त्यामुळे आजचा दिवस फार खास असणार आहे. त्याचबरोबर, आज भद्र आणि बुधादित्य राजयोगाचा शुभ संयोग जुळून आला आहे. त्यामुळे आजच्या दिवसाला विशेष महत्त्व आहे.
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ 5 राशींना मिळणार आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
वृषभ रास (Taurus Horoscope)
वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस भाग्यशाली असणार आहे. आज रविवार सुट्टीचा दिवस असल्या कारणाने तुमचा दिवस निवांत जाईल. तसेच, तुम्ही हाती घेतलेल्या कार्यात तुम्हाला चांगलं यश मिळेल. तुमच्या भौतिक सुख-समृद्धीत चांगली वाढ झालेली दिसेल. आज कुटुंबियांबरोबर तुम्ही चांगला वेळ घालवू शकता.
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीसाठी आजचा दिवस फार खास असणार आहे. आज तुम्ही आखलेल्या योजना पूर्ण होतील. तसेच, कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचा तुम्हाला चांगला सपोर्ट मिळेल. नवीन जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवण्यात येऊ शकतात. तसेच, धार्मिक कार्यात तुमचा सहभाग वाढलेला दिसेल.
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीसाठी आजचा दिवस फार खास असणार आहे. आज तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ मिळेल. त्यामुळे तुम्ही फार खुश असाल. तसेच, जवळच्या नातेवाईकांशी भेटीगाठी होतील. सूर्याच्या संक्रमणाने या राशीला चांगला लाभ मिळेल. महत्त्वाची कामे आत्ताच पूर्ण करुन घ्या.
कन्या रास (Virgo Horoscope)
कन्या राशीसाठी आजचा दिवस महत्त्वाकांक्षेचा असणार आहे. आज तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल. तसेच, नशिबाची तुम्हाला चांगली साथ लाभेल. मुलांसाठी आजचा दिवस आनंदाचा असणार आहे. नवीन गोष्टी शिकण्याची ही चांगली संधी आहे.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ राशीसाठी आजचा दिवस फार लाभदायक असणार आहे. देवी लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होऊन तुम्हाला धनलाभ होऊ शकतो. त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. तसेच, आज तुमच्या कामासाठी इतरांवर अवलंबून राहू नका. तुमची कामे तुम्ही स्वत: करा. धार्मिक कार्यात तुमची रुची वाढलेली दिसेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :