Astrology Panchang Yog 13 March 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 13 मार्च म्हणजेच गुरुवारचा दिवस आहे. आजचा दिवस दत्तगुरुंना समर्पित आहे. आज फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी होलिका दहनाचा शुभ मुहूर्त जुळून आला आहे. तसेच, आज गुरुवारच्या दिवशी लक्ष्मी नारायण योगचा (Yog) देखील शुभ संयोग जुळून आला आहे. त्यामुळे आजचा दिवस खास आहे. आज भगवान विष्णू आणि लक्ष्मीच्या कृपेने अनेक राशी भाग्यशाली ठरतील. या राशींच्या करिअरमध्य़े चांगलं यश मिळेल.
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ 5 राशींना मिळणार आहे. या राशी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक ठरणार आहे. तसेच, आज दिवसभरात तुम्हाला एखादी शुभवार्ता ऐकायला मिळू शकते. तसेच कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचा चांगला पाठिंबा मिळेल. या राशींची करिअरमध्ये चांगली प्रगती पाहायला मिळेल. आज भाग्य तुमच्या बाजूने असेल. त्यामुळे कोणतीही चिंता करण्याची गरज नाही.
कर्क रास (Cancer Horoscope)
होलिका दहनाचा शुभ मुहूर्त कर्क राशीच्या लोकांसाठी फार शुभ असणार आहे. या काळात तुम्हाला तुमच्या कुटुंबियांची चांगली साथ मिळेल. सामाजिक क्षेत्रात तुमचा चांगला विकास झालेला असेल. तसेच, घरी पाहुण्यांचं देखील आगमन होण्याची शक्यता आहे. संध्याकाळचा वेळ धार्मिक कार्यात घालवा.
तूळ रास (Libra Horoscope)
आज जुळून आलेल्या लक्ष्मी नारायण योगामुळे तूळ राशीचा आजचा दिवस फार खास असणार आहे. आज तुम्हाला तुमच्या मेहनतीचं चांगलं फळ मिळेल. तसेच, समाजातील प्रतिष्ठित व्यक्तीशी भेट होईल. व्यावसायिकांना आज चांगली डील मिळू शकते. त्यामुळ तुमचं मन देखील उत्साहित असणार आहे. अचानक धनलाभ होईल.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
आजचा दिवस वृश्चिक राशीच्या लोकांसाठी फार चांगला ठरणार आहे. आज भौतिक सुख-सुविधांचा तुम्हाला लाभ घेता येईल. तुमच्या वाणीत मधुरता असेल. सासरच्या मंडळींकडून तुम्हाला चांगली वागणूक मिळेल. तसेच, आज तुम्ही तुमच्या कमाईने एखादी वस्तूची खरेदी कराल ज्यातून तुम्हाला खूप आनंद मिळेल.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आर्थिक दृष्टीकोनातून चांगला असणार आहे. आज देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमच्याकडे भरपूर पैसा असेल. तुम्हाला पैशांची कमतरता भासणार नाही. तसेच, कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचा चांगला पाठिंबा पाहायला मिळेल. आज तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होईल. संध्याकाळी घरी पाहुणे येण्याची शक्यता आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: