Astrology Panchang Yog 12 June 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 12 जून म्हणजेच गुरुवारचा दिवस आहे. आजचा दिवस हा दत्तगुरुंना समर्पित आहे. तसेच, आजच्या दिवशी चंद्राने मिथुन राशीत प्रवेश करुन समसप्तक आणि गजकेसरी योग जुळून आला आहे. त्यामुळे आजचा दिवस फार खास असणार आहे. आजच्या शुभ राशींवर भगवान विष्णूचा आशीर्वाद असणार आहे. 

Continues below advertisement


वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ 5 राशींच्या लोकांना होणार आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात. 


वृषभ रास (Taurus Horoscope)


वृषभ राशीसाठी आजचा दिवस फार महत्त्वाचा असणार आहे. आज तुमच्या कामकाजात चांगली वाढ झालेली दिसेल. तसेच, तुमचा व्यवसाय देखील सुरळीत चालेल. नोकरदार वर्गातील लोकांना तुमच्या मनाप्रमाणे ट्रान्सफर मिळू शकते. तसेच, धार्मिक कार्यात तुमचं मन जास्त रमेल. त्यामुळे तुमच्या मनाला शांती मिळेल. 


सिंह रास (Leo Horoscope)


सिंह राशीसाठी आजचा दिवस फार सकारात्मक असणार आहे. आज तुमच्यातील आत्मविश्वास दिसून येईल. तसेच,तुमच्या बुद्धीमत्तेचा चांगला कस लागेल. समाजातील प्रभावशाली लोकांशी तुमच्या गाठीभेटी होतील. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली असेल. त्यामुळे तुम्हाला आर्थिक अडचण जाणवणार नाही. 


वृश्चिक रास (Scorpio Horoscope)


वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस खास असणार आहे. भगवान विष्णूची तुमच्यावर कृपा असणार आहे. तसेच, तुम्ही जी कामे नियोजित केली आहेत ती तुम्हाला वेळेत पूर्ण करता येतील. समाजातील प्रतिष्ठीत व्यक्तींशी तुमच्या भेटीगाठी होतील. कामाच्या निमित्ताने तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो. तसेच, मुलांच्या कलात्मकतेला चांगला वाव मिळेल. 


मकर रास (Capricorn Horoscope)


मकर राशीसाठी आजचा दिवस फार महत्त्वाचा असणार आहे. आज तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल. तसेच, अनेक दिवसांपासून तुमच्या मनात जी इच्छा दडलेली होती ती आज पूर्ण होण्याची शक्यता आहे. तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळेल. कामाच्या निमित्ताने तुम्ही फिरायला जाऊ शकता. 


कुंभ रास (Aquarius Horoscope)


कुंभ राशीसाठी आजचा दिवस फार शुभकारक असणार आहे. आज तुमच्या मार्गातील सर्व अडथळे दूर होतील. तसेच, समाजात तुमच्या कामाचं कौतुक केलं जाईल. जोडीदाराचा चांगला सपोर्ट मिळेल. तसेच, घरातील वातावरण देखील प्रसन्न असणार आहे. आज मित्रांबरोबर तुम्ही चांगला वेळ घालवू शकता. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  


हेही वाचा :  


Horoscope Today 12 June 2025 : आजचा दिवस 5 राशींसाठी ठरणार वरदान; घरात लक्ष्मीच्या पावलांनी येणार पैसा, आजचे राशीभविष्य