Astrology Panchang Yog 08 April 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 8 एप्रिल म्हणजेच मंगळवारचा दिवस आहे. आजच्या दिवशी चैक्ष शुक्ल एकादशी आहे. आज आश्लेषा नक्षत्रासह अनेक शुभ योग (Yog) जुळून आले आहेत. तसेच, आज सर्वार्थ सिद्धी योगासह गजकेसरी योगदेखील जुळून आला आहे. त्यामुळे आज अनेक राशींना याचा लाभ मिळणार आहे. 

वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा 5 राशांना चांगलाच लाभ मिळणार आहे. या राशी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात. 

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सकारात्मक असणार आहे. या राशीच्या लोकांची कामे आज पूर्ण होऊ शकतात. तसेच, उत्पन्नाचे नवे मार्ग तुमच्यासाठी खुले होतील. व्यवहाराचा चांगला विस्तार झालेला पाहायला मिळेल. तसेच, तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळेल. नोकरदार वर्गातील लोकांना प्रमोशन मिळण्याची देखील शक्यता आहे. 

सिंह रास (Leo Horoscope)

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. या राशीच्या लोकांसाठी उत्पन्नाचे नवे मार्ग सुरु होतील. तसेच, बिझनेसमध्ये नवीन ऑर्डर्स तुम्हाला मिळतील. भौतिक सुख-सुविधांचा लाभ घ्याल. मुलांच्या बाबतीत जास्त शिस्तप्रिय राहू नका. अन्यथा त्यांना दडपण येईल. तसेच, तुमच्या वैवाहिक जीवनातील सर्व अडथळे दूर होऊन नवीन आयुष्याची तुम्ही सुरुवात कराल. 

कन्या रास (Virgo Horoscope)

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस भाग्याचा असणार आहे. या राशीच्या लोकांना एखाद्या नवीन कार्याची सुरुवात करायची असल्यास तुमच्यासाठी हा काळ चांगला असणार आहे. देवी लक्ष्मीची तुमच्यावर कृपा असल्या कारणाने तुम्हाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागणार नाही. कामाच्या बाबतीत कोणताच हलगर्जीपणा करु नका. वैवाहिक जीवन आनंदी असेल. 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक असणार आहे. या काळात तुमच्या कलागुणांना चांगला वाव मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचं बॉसकडून चांगलं कौतुक होईल. तसेच, तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळेल. तुमच्या कुटुंबात देखील आनंदी वातावरण पाहायला मिळेल. भौतिक सुख सुविधांचा लाभ घ्याल. 

मीन रास (Pisces Horoscope)

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभकारक असणार आहे. या राशीच्या लोकांचा ओढा आध्यात्मिक दृष्टीने असणार आहे. सरकारी योजनांचा तुम्हाला चांगला लाभ घेता येईल. तसेच, तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळेल. मित्रांचा चांगला पाठिंबा तुम्हाला या काळात मिळे. तसेच, हाती घेतलेल्या कामाला चांगलं यश मिळेल. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:        

Numerology : दुसऱ्यांचे पैसे उडवण्यात पटाईत असतात 'या' जन्मतारखेच्या मुली; स्वतःचा खिसा कधीच करत नाहीत रिकामा