Astrology Panchang Yog 05 April 2025 : आज 5 एप्रिलचा दिवस म्हणजेच शनिवारचा दिवस आहे. आजच्या दिवशी शनिदेवाचा (Shani Dev) वार असल्या कारणाने आजचा दिवस काही राशींसाठी शुभ असणार आहे. तसेच, आजच्या दिवशी चतुर्ग्रही योग (Yog) देखील असल्यामुळे आजचा दिवस खास आहे. आज चैत्र महिन्याची दुर्गाष्टमी तिथी आहे.याच दिवशी चंद्राचा मिथुन राशीत प्रवेश झाला आहे. त्यामुळे अमला योग देखील जुळून आला आहे. याचा अनेक राशींना (Zodiac Signs) लाभ मिळणार आहे.
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आजचा दिवस 5 राशींसाठी शुभ असणार आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
वृषभ रास (Taurus Horoscope)
वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभकारक असणार आहे. तुमचं एखादं काम पूर्ण करण्यासाठी सकाळची वेळ तुमच्यासाठी शुभ असणार आहे. तसेच, मित्रांबरोबर तुमचा व्यवहार चांगला असेल. आज तुम्हाला काहीतरी नवीन शिकण्याची संधी मिळेल. या संधीचा योग्य तो लाभ घ्या. वैवाहिक जीवनात आनंद राहील. तसेच, दिवसभरात तुम्हाला एखादी शुभवार्ता मिळेल.
कर्क रास (Cancer Horoscope)
कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आज तुम्हाला पैसे कमावण्याच्या चांगल्या संधी मिळतील. तसेच, तुमच्या कामाने ऑफिसमध्ये तुमचा बॉस प्रभावित होईल. तुमचं प्रमोशन देखील होण्याची शक्यता आहे. आज तुमचे अनेक दिवसांपासून रखडलेले पैसे तुम्हाला परत मिळू शकतात. राजकारणात सक्रिय असाल.
कन्या रास (Virgo Horoscope)
कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक असणार आहे. आज तुम्हाला तुमच्या मेहनतीचं चांगलं फळ मिळेल. तसेच, सामाजिक क्षेत्रात तुमचा चांगला वावर पाहायला मिळेल. आज काही अनोळखी लोकांशी तुमच्या गाठीभेटी होतील. तसेच, मनोरंजन क्षेत्रात तुमची चांगली प्रगती होईल. वाहनसुख मिळेल.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस भाग्याचा असणार आहे. देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमच्यावर आलेलं संकट दूर होईल. तसेच, तुम्ही नियोजित केलेलं काम पूर्ण झाल्यामुळे तुम्हाला जास्त आनंद होईल. आज घरात आनंदी वातावरण पाहायला मिळेल. तसेच, धार्मिक गोष्टीत तुमचं मन रमेल. जवळच्या नातेवाईकांशी गाठीभेटी होतील.
मकर रास (Capricorn Horoscope)
मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सकारात्मक असणार आहे. आज सकाळपासूनच तुम्ही फार उत्साही असाल. तसेच, नवीन काहीतरी शिकण्याची तुमची इच्छा निर्माण होईल. कोणत्याही गोष्टीकडे तुम्ही सकारात्मक दृष्टीने पाहाल. तसेच, तुमचं आज महत्त्वाचं काम पूर्ण होईल. तुमच्या जोडीदाराची तुम्हाला चांगली साथ लाभेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: