Astrology Panchang Yog 04 April 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 04 एप्रिलचा दिवस म्हणजेच शुक्रवारचा दिवस आहे. आजच्या दिवशी शुक्र बुधासह लक्ष्मी नारायण योग (Yog) जुळून आला आहे. तसेच, आजच्या दिवशी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमी तिथी आहे. तसेच, आजच्या दिवशी चंद्र आणि मंगळ ग्रह एकत्र मिळून दुतर्फा लाभ मिळाल्याने दुरुधरा योग जुळून आला आहे. आजच्या शुभ राशींच्या लोकांना अचानक लाभ मिळेल. 

Continues below advertisement

वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ 5 राशींच्या लोकांना मिळणार आहे. या राशी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात. 

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. या राशीच्या लोकांना अनेक स्त्रोतातून चांगला लाभ मिळणार आहे. या राशीच्या लोकांची करिअरमध्ये चांगली प्रगती दिसून येईल. तसेच, जर तुम्हाला नोकरीत काही बदल करायचे असतील, नवीन नोकरी शोधायची असेल तर त्यासाठी आजचा दिवस शुभ असणार आहे. 

Continues below advertisement

सिंह रास (Leo Horoscope)

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक असणार आहे. तुम्हाला कामाच्या ठिकाणी नवीन प्रोजेक्टवर काम करण्याची संधी मिळेल. तसेच, तुमच्या करिअरमध्ये चांगली ग्रोथ झालेली असेल. नवीन गोष्टी शिकण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल. तसेच, कोर्ट कचेरीच्या संदर्भातील वाद लवकरच मिटतील. 

तूळ रास (Libra Horoscope)

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक असणार आहे. तुम्हाला आज नशिबाची चांगली साथ मिळेल. तसेच, वडिलोत्पार्जित संपत्तीतून तुम्हाला चांगला लाभ मिळण्याची शक्यता आहे. आज संध्याकाळचा वेळ तुम्ही धार्मिक कार्यात घालवाल. त्यामुळे तुमच्या मनाला शांती मिळेल. सकारात्मक दृष्टीकोन राहील. 

धनु रास (Sagittarius Horoscope)

धन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस उत्साहाचा असणार आहे. आज तुमच्या नोकरीत अनुकूल परिस्थिती असेल. ऑफिसमध्ये सहकाऱ्यांचा तुम्हाला चांगला पाठिंबा मिळेल. तसेच, देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमची आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा चांगली असेल. आज नवीन लोकांशी गाठीभेटी होतील. कुटुंबात आनंदी वातावरण पाहायला मिळेल. 

कुंभ रास (Aquarius Horoscope)

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आज तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ मिळेल. तसेच, तुम्ही गुंतवून ठेवलेल्या पैशांतून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. भविष्यासाठी तुम्ही चांगली गुंतवणूक करु शकता. तसेच, वैवाहिक जीवन अगदी सुरळीत चालेल. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Horoscope Today 04 April 2025 : आज 'या' 3 राशींनी ताकही फुंकून पिणे; पदोपदी मिळणार सावधानतेचा इशारा, वाचा आजचे राशीभविष्य