Astrology Panchang 28 November 2024 : आज बुधवार, 27 नोव्हेंबरला चंद्र कन्या राशीनंतर सिंह राशीत प्रवेश करणार आहे. तसेच आज मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील द्वादशी तिथी असून या दिवशी आयुष्मान योग, सौभाग्य योग आणि चित्रा नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजचं महत्त्व अधिकच वाढलं आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 3 राशींना (Zodiac Signs) या शुभ योगांचा फायदा होणार आहे, या राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप खास असणार आहे. मिथुन राशीचे लोक आजचा संपूर्ण दिवस धार्मिक कार्यात व्यतीत करतील आणि इतरांना मदत करताल. आज तुम्हाला काही मालमत्ता किंवा अनपेक्षित स्त्रोतांकडून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. आज नोकरी करणाऱ्यांना करिअरमध्ये नवीन संधी मिळतील आणि ऑफिसमध्येही आपला ठसा उमटवता येईल. त्याच वेळी, व्यावसायिकांना नफा मिळवण्याच्या चांगल्या संधी मिळतील आणि ते त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांना चांगली टक्कर देऊ शकतील. संध्याकाळी तुमच्या जोडीदारासोबत एखाद्या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल.
कन्या रास (Virgo Horoscope Today)
कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक असणार आहे. आज दुपारपर्यंत तुम्हाला एखाद्या नातेवाईकाकडून एखादी चांगली बातमी ऐकू येईल, ज्यामुळे तुम्ही खूप आनंदी व्हाल. आज व्यावसायिक नफा मिळवण्यासाठी जी काही धोरणं आखतील, ती उत्कृष्ट ठरतील. जर तुम्ही नवीन नोकरीच्या शोधात असाल तर आज बाप्पाच्या आशीर्वादाने चांगली संधी मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमचं उत्पन्न वाढेल. आज संपूर्ण कुटुंबासह कुठेतरी बाहेर जाण्याचा प्लॅन देखील करू शकता. घरातील लहान मुलांसोबत संध्याकाळचा वेळ घालवाल.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ आणि फलदायी असणार आहे. वृश्चिक राशीच्या लोकांचं आरोग्य आज चांगलं राहील, ज्यामुळे ते उत्साहाने परिपूर्ण असतील. भाड्याने राहणाऱ्यांचं स्वतःचं घर घेण्याचं स्वप्न आज पूर्ण होताना दिसत आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात काही नवीन संधी मिळतील. नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना नशिबाची साथ मिळाल्यास त्यांना करिअर सुरू करण्याची संधी मिळेल. वैवाहिक जीवनाबद्दल बोलायचं झालं तर, तुमच्या जोडीदारासोबत काही वाद चालू असतील तर ते आज संपुष्टात येतील आणि नात्यात नवीनता येईल. संध्याकाळी मित्रांसोबत विनोद करण्याच्या मूडमध्ये असाल.
मकर रास (Capricorn Horoscope Today)
आजचा दिवस मकर राशीच्या लोकांसाठी खूप खास असणार आहे. आज तुम्ही केलेल्या कामाचं सर्वत्र कौतुकही होईल. आर्थिक जीवनाबद्दल बोलायचं झाल्यास, तुम्हाला पैशाशी संबंधित बाबींमध्ये सकारात्मक बदल दिसतील आणि तुम्ही ऑनलाइन शॉपिंग देखील करू शकता. नोकरी करणाऱ्यांचे परिश्रम व्यर्थ जाणार नाहीत आणि अधिकाऱ्यांचं कौतुकही होईल. आजचा दिवस व्यापाऱ्यांसाठी नवीन धोरणं विकसित करण्यासाठी चांगला असेल आणि या धोरणांमुळे चांगला नफाही मिळेल. तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबत आनंददायी वेळ घालवाल, ज्यामध्ये कुटुंबातील लहान मुलं देखील मजा करताना दिसतील.
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
कुंभ राशीच्या लोकांसाठी आज म्हणजेच २७ नोव्हेंबर हा दिवस नवीन उत्साह घेऊन येणार आहे. कुंभ राशीच्या लोकांची एखादी मौल्यवान वस्तू किंवा संपत्ती मिळण्याची इच्छा आज पालकांच्या आशीर्वादाने पूर्ण होईल. विवाहयोग्य लोकांसाठी आज चांगले प्रस्ताव येतील, ज्यामुळे कुटुंबातील सदस्य खूप आनंदी दिसतील. तुमच्या भावंडांसोबतच्या नात्यात काही कलह चालला असेल तर तो आज संपुष्टात येईल आणि तुमचं नातंही घट्ट होईल. तुमच्या जोडीदाराचा सल्ला आज तुमच्या व्यवसायासाठी उपयुक्त ठरेल, ज्यामुळे चांगला नफा मिळेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: