Astrology 27 July 2024 : ग्रहांच्या स्थितीनुसार, आजचा दिवस महत्त्वाचा आहे. आज शनिवारी, 27 जुलै रोजी मीन राशीनंतर चंद्र मेष राशीत जाणार असून शनिदेव त्याच्या मूळ त्रिकोण राशीत कुंभ राशीत स्थित आहे, त्यामुळे शश राजयोग तयार होत आहे. तसेच आज आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील सप्तमी तिथी असून या दिवशी षष्ठ राजयोगासह रवियोग, शुक्रादित्य योग आणि रेवती नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजचं महत्त्व अधिकच वाढलं आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 5 राशींना आज तयार होत असलेल्या शुभ योगांचा लाभ मिळेल. या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घ्या.


मेष रास (Aries)


मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी असणार आहे. मेष राशीच्या लोकांना आज प्रत्येक कामात भाऊ-बहिणीची साथ मिळेल. शनिदेवाच्या कृपेने आज दीर्घकाळ रखडलेली कामं पूर्ण होतील आणि धार्मिक कार्यातही रस घ्याल. कौटुंबिक मालमत्तेशी संबंधित काही प्रकरण चालू असेल तर ते आज सोडवलं जाईल. व्यापाऱ्यांना आज व्यवसायात चांगला नफा मिळू शकेल. त्याच वेळी, नोकरदार लोकांना आज त्यांच्या करिअरमध्ये चांगली प्रगती दिसेल, त्यांना एखाद्या चांगल्या पदासह इतर कंपनीकडून ऑफर मिळू शकते. कौटुंबिक जीवनात चांगलं सामंजस्य राहील आणि घरातील लहान मुलांसोबत चांगला वेळ जाईल. तुमचे तुमच्या जोडीदाराशी चांगले संबंध असतील आणि दोघेही एकमेकांच्या भावना समजून घेऊन काम कराल.


कर्क रास (Cancer)


आजचा दिवस कर्क राशीच्या लोकांसाठी फायदेशीर असणार आहे. आज तुम्ही करिअरमध्ये चांगली प्रगती करू शकाल. जर तुम्ही मालमत्तेमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर हे तुमच्यासाठी सर्वोत्तम असेल, याचा तुम्हाला भविष्यात चांगला नफा होईल. आज बुद्धिमत्तेच्या जोरावर व्यवसायाचा विस्तार करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. नोकरीतील लोकांना आज सहकाऱ्यांमुळे अनेक आव्हानांना सामोरं जावं लागेल. आज कुटुंबात वातावरण आनंदाचं असेल. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल आणि मुलांसोबत कुठेतरी बाहेर जाण्याचा विचारही कराल.


कन्या रास (Virgo)


आजचा दिवस कन्या राशीच्या लोकांसाठी शुभ असणार आहे. विद्यार्थ्यांना शिक्षक आणि वडिलांचं सहकार्य मिळेल आणि स्पर्धा परीक्षांचा मार्ग मोकळा होईल. जर तुम्हाला एखादी गाडी किंवा जमीन खरेदी करायची असेल तर आज शनिदेवाच्या कृपेने तुमची मनोकामना पूर्ण होईल आणि पैसा कुठेतरी अडकण्याची शक्यता आहे. आज तुमची बोलण्याची पद्धत पाहून बरेच लोक प्रभावित होतील. नोकरी करणारे आज मित्रामार्फत एखाद्या कंपनीत मुलाखतीसाठी जाऊ शकतात, त्यात तुम्हाला यश मिळेल. कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन चांगलं राहील आणि घरातील सर्व जबाबदाऱ्या तुम्ही पार पाडाल.


वृश्चिक रास (Scorpio)


वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अनुकूल असणार आहे. नशिबाने साथ दिल्याने तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. आज तुम्ही पैशाशी संबंधित काही महत्त्वाचे निर्णय घ्याल. व्यवसायात तुम्ही आज स्पर्धकांना कठीण स्पर्धा देऊ शकाल आणि व्यवसाय वाढवण्यासाठी नवीन योजनांवर काम कराल. विवाहित लोक आज त्यांच्या नात्यात आनंदी राहतील आणि एकमेकांसमोर त्यांच्या भावना व्यक्त करू शकतील. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला असेल, त्यांना काहीतरी नवीन शिकण्याची आणि समजून घेण्याची संधी मिळेल. कौटुंबिक जीवनात काही कलह सुरू असेल तर ते आज संपतील. संध्याकाळी मित्रांसोबत फिरण्याची संधी मिळेल.


मीन रास (Pisces)


आजचा दिवस मीन राशीच्या लोकांच्या आयुष्यात आशेचा नवीन किरण घेऊन येईल. मीन राशीच्या लोकांना आज शनिदेवाच्या कृपेने अनेक मनोकामना पूर्ण होतील आणि अचानक एखादी चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. प्रॉपर्टी किंवा शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आजचा दिवस चांगला असेल आणि तुम्हाला सरकारी योजनांचा लाभही घेता येईल. कुटुंबासोबत कुठेतरी बाहेर जाण्याची योजना बनू शकते, ज्यामध्ये तुमचे भाऊ-बहीण तुम्हाला साथ देतील. तुमच्या जोडीदारासोबत तुमचा वेळ चांगला जाईल आणि लहान मुलं देखील खूप आनंदी दिसतील. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


हेही वाचा :


Numerology : प्रचंड हुशार असतात 'या' जन्मतारखेचे लोक; सर्वांच्या मनावर करतात राज्य, जिथे जातील तिथे होतं यांचं कौतुक