Astrology 26 May 2024 : ग्रहांच्या स्थितीनुसार, आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे. आज, रविवार, 26 मे रोजी चंद्र धनु राशीत भ्रमण करेल. वृषभ राशीत गुरु आणि सूर्य असल्यामुळे आज गुरु आदित्य राजयोग तयार होत आहे. तसेच आज वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षातील तृतीया तिथी असून या दिवशी गुरु आदित्य राजयोगासोबत साध्य योग, सर्वार्थ सिद्धी योग आणि मूल नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजचं महत्त्व वाढलं आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार 5 राशींना आज बनत असलेल्या शुभ योगांचा लाभ मिळेल. या भाग्यवान राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
वृषभ रास (Taurus)
वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस उत्साहाचा असणार आहे. वृषभ राशीच्या लोकांना आज जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात नवीन संधी मिळतील, ज्यामुळे तुम्ही दृढनिश्चय आणि आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल. पैसा आणि आरोग्याच्या दृष्टीने आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल असेल, तुम्ही पैशाचे व्यवस्थापन करू शकाल आणि धार्मिक कार्यातही सहभागी व्हाल. रविवारच्या सुट्टीमुळे तुम्हाला तुमचा जोडीदार आणि कुटुंबासोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल. व्यवसाय करणाऱ्यांना चांगला नफा मिळू शकेल आणि चांगल्या संधींमध्ये वाढ होईल. आज तुम्हाला उत्साही वाटेल आणि मित्रांसोबत कुठेतरी बाहेर जाण्याचा प्लॅनही कराल.
सिंह रास (Leo)
सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस यशस्वी राहणार आहे. सिंह राशीच्या लोकांना आज नफा मिळवण्याच्या अनेक नवीन संधी मिळतील आणि दीर्घकाळ प्रलंबित कामं पूर्ण होण्याची शक्यता आहे. तुम्ही कामात केलेल्या मेहनतीमुळे तुम्हाला आज प्रचंड यश मिळेल, ज्यामुळे तुमचा आदर आणि सन्मान वाढेल आणि तुम्हाला अनेक प्रभावशाली लोक भेटतील. नशीब तुमच्या बाजूने असल्याने तुम्हाला सर्व प्रकारच्या भौतिक सुखसोयी मिळतील आणि तुमचा फिटनेसही पूर्णपणे चांगला राहील. व्यवसाय करणारे आज स्पर्धकांना चांगली स्पर्धा देतील आणि एक मजबूत व्यापारी म्हणून उदयास येतील. तुमच्या पालकांशी तुमचे संबंध चांगले राहतील आणि घरातील लहान मुलांसोबत वेळ घालवल्याने मानसिक शांतीही मिळेल. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत आज काही जमीन खरेदी करू शकता.
धनु रास (Sagittarius)
आजचा दिवस धनु राशीच्या लोकांसाठी शुभ आणि फलदायी असणार आहे. आज सूर्यदेवाच्या कृपेने धनु राशीच्या लोकांना समाजातील प्रतिष्ठित लोकांशी संपर्क साधता येईल. तुमच्यामध्ये तीव्र इच्छाशक्ती आणि उत्साह असेल, ज्याचे तुमच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतील. वैवाहिक जीवनात चालू असलेल्या अडथळ्यांपासून तुम्हाला आराम मिळेल आणि अनुकूल संबंध टिकवून ठेवण्यात यश मिळेल. व्यावसायिकांनी केलेल्या परिश्रमाचे आज योग्य फळ मिळेल आणि एखादा मोठा सौदा होऊ शकतो, ज्यामुळे चांगला नफाही मिळेल. नोकरदार लोक दिवसभर रिलॅक्स मूडमध्ये राहतील. कौटुंबिक जीवन चांगलं राहील आणि तुमचे भावा-बहिणींसोबतचे संबंध चांगले राहतील.
कुंभ रास (Aquarius)
आजचा म्हणजेच, २६ मे चा दिवस कुंभ राशीच्या लोकांसाठी फायदेशीर असणार आहे. कुंभ राशीचे लोक आज कौटुंबिक सदस्यांसोबत चांगला वेळ घालवतील आणि नवीन मालमत्ता मिळण्याची शक्यता आहे. या राशीचे लोक ज्यांना नोकरी किंवा शिक्षणासाठी परदेशात जायचं आहे, त्यांची इच्छा आज सूर्यदेवाच्या कृपेने पूर्ण होऊ शकते. तुमचा पैसा कुठेतरी अडकला असेल तर आज परत येण्याची शक्यता आहे. आज तुम्हाला तुमच्या मुलांकडून काही चांगली बातमी ऐकायला मिळेल आणि कुटुंबात काही खास पाहुणेही येऊ शकतात. रविवारच्या सुट्टीमुळे सर्व सदस्य घरीच राहतील आणि रुचकर पदार्थांचा आस्वाद घेतील. तुमच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर तुम्ही पैशाशी संबंधित काही महत्त्वाचे निर्णय घ्याल, ज्यामुळे तुमच्या जीवनात समृद्धी आणि स्थिरता येईल. व्यापारी आज व्यवसायात आपले वर्चस्व प्रस्थापित करतील आणि चांगला नफा कमावतील.
मीन रास (Pisces)
मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप खास असणार आहे. मीन राशीच्या लोकांना आज बचत करता येईल आणि अनेक नवीन स्रोतांमधून पैसे कमवण्याची संधीही मिळेल. तुम्हाला आरोग्याशी संबंधित कोणत्याही समस्येचा सामना करावा लागणार नाही आणि तुम्ही पूर्णपणे तंदुरुस्त दिसाल. वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात तुम्ही प्रत्येक काम उत्साहाने कराल आणि तुम्हाला सुख-सुविधांमध्येही चांगली वाढ होईल. जे स्वतःचा व्यवसाय चालवतात त्यांना आज चांगला नफा मिळेल आणि व्यवसायात यश मिळेल. तुम्ही संपूर्ण कुटुंबासह धार्मिक स्थळी जाऊ शकता आणि घराच्या नूतनीकरणाबाबतही चर्चा करू शकता. तुम्ही कुटुंबातील तुमच्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडाल आणि लोक तुमची प्रशंसा करताना दिसतील. अविवाहित व्यक्तींना चांगले लग्नाचे प्रस्ताव येतील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :