Margashirsha Guruvar 2024 : ज्योतिषशास्त्रानुसार, मार्गशीर्षच्या शेवटच्या गुरुवारपासून , म्हणजेच 26 डिसेंबरपासून (Saphala Ekadashi 2024) अनेक ग्रहांच्या चाली बदलत आहेत, ज्याचा परिणाम सर्व राशींवर होईल. गुरुवारी, 26 डिसेंबर रोजी चंद्र तूळ राशीत जात असून सूर्य, बुध आणि शुक्र हे ग्रह सूर्याच्या बाजूला असल्यामुळे उभयचारी योग निर्माण होत आहे. याशिवाय सुकर्म योग आणि स्वाती नक्षत्राचा शुभ संयोग होत असल्याने याचा शुभ परिणाम 3 राशींवर होणार आहे. या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.


वृषभ (Taurus)


वृषभ राशीच्या लोकांसाठी येणारा काळ खास असणार आहे. या काळात नोकरदारांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चांगले संबंध निर्माण होऊ शकतात. अशा स्थितीत तुम्ही तुमचे ध्येय साध्य करण्यात यशस्वी होऊ शकता. तुमच्या कामाच्या आणि मेहनतीच्या जोरावर पदोन्नतीसह पगारात वाढ होऊ शकते. तुमची दीर्घकाळ प्रलंबित असलेली कोणतीही इच्छा पूर्ण होऊ शकते. व्यवसायातही यश मिळण्याची शक्यता आहे आणि अनेक लांबचे प्रवास करावे लागतील. याचा तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकतो. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. प्रलंबित कामे पूर्ण होतील.


तूळ (Libra)


तूळ राशीच्या लोकांसाठी 26 डिसेंबरपासूनचा काळ लाभदायक आहे. या राशीच्या लोकांना अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतो. करिअरच्या क्षेत्रात बरेच फायदे मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या मेहनतीचे आणि प्रयत्नांचे फळ मिळू शकते. व्यापार क्षेत्राबद्दल बोलायचं झालं तर, काही अडचणी येऊ शकतात. पण जर आपण रणनीती अवलंबली तर आपण नक्कीच यश मिळवू शकता. आर्थिक स्थिती चांगली राहील, मात्र अनावश्यक खर्च होऊ शकतो. अशा स्थितीत, आपण अनावश्यक खर्च टाळला पाहिजे. आरोग्याबाबत थोडे सावध राहा.


कुंभ (Aquarius)


26 डिसेंबरपासूनचा काळ कुंभ राशीच्या लोकांसाठी सकारात्मक असणार आहे. या राशीच्या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये बरेच फायदे मिळण्याची शक्यता आहे. या राशीच्या लोकांना प्रमोशनसह बक्कळ पगारवाढ मिळू शकते. व्यवसायाच्या क्षेत्रातही तुम्हाला मोठा नफा होऊ शकतो. आयात-निर्यात व्यवसायात भरपूर नफा कमावता येईल. वडिलोपार्जित संपत्ती मिळण्याची शक्यता जास्त आहे. यासोबतच तुमच्या जोडीदारासोबत तुमचा वेळ चांगला जाईल. कुटुंबासोबत आनंदाने आणि शांततेने राहाल. आरोग्य चांगलं राहील.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा:


Surya Gochar 2024 : 29 डिसेंबरपासून चमकणार 3 राशींचं नशीब; सूर्याचा शुक्राच्या नक्षत्रात प्रवेश, अचानक धनलाभासह बँक बॅलन्स वाढणार