Astrology 24 May 2024 : ग्रहांच्या स्थितीनुसार, आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे. आज, शुक्रवार, 24 मे रोजी चंद्र वृश्चिक राशीत भ्रमण करेल. तसेच आज वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षाची प्रतिपदा तिथी आहे, म्हणजेच आजपासून वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षाला सुरुवात झाली. या पहिल्याच दिवशी शिवयोग, सिद्ध योग, सर्वार्थ सिद्धी योग आणि ज्येष्ठ नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजच्या दिवसाचं महत्त्व वाढलं आहे. वैदिक ज्योतिषानुसार, मिथुन राशीसह 3 राशींना आज तयार होत असलेल्या शुभ योगांचा फायदा होईल. या भाग्यवान राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
मिथुन रास (Gemini)
मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप खास असणार आहे. मिथुन राशीच्या लोकांची कोणतीही अपूर्ण इच्छा आज पूर्ण होऊ शकते आणि अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. देवी लक्ष्मीच्या कृपेने तुम्हाला पैशाची कमतरता जाणवणार नाही आणि तुम्हाला वडिलोपार्जित संपत्ती किंवा इतर अनपेक्षित स्त्रोतांकडून पैसे मिळू शकतात, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. आज व्यावसायिकांना त्यांच्या बुद्धिमत्तेमुळे आणि निर्णयांमुळे चांगला नफा मिळेल आणि प्रतिस्पर्धीही तुमची प्रशंसा करताना दिसतील. आजपासून रोजगाराच्या शोधात असलेल्या तरुणांचं करिअर सुरू होऊ शकते. लव्ह लाईफबद्दल बोलल्यास, सर्व गैरसमज दूर होतील आणि तुमच्या नात्यात नवीनता येईल. कौटुंबिक जीवनाबद्दल बोलायचं झाल्यास, आपण कुटुंबातील सदस्यांसह कुठेतरी फिरायला जाण्याचा विचार करू शकता.
सिंह रास (Leo)
आजचा दिवस सिंह राशीच्या लोकांसाठी चांगला असणार आहे. सिंह राशीचे लोक आज प्रत्येक काम आत्मविश्वासाने पूर्ण करतील आणि तुम्हाला तुमच्या कामाचा अभिमानही वाटेल. तुमचं एखादं काम अडकलं असेल किंवा कोणतीही इच्छा पूर्ण होत नसेल तर आज नशिबाच्या मदतीने ते काम पूर्ण होईल आणि तुमची इच्छाही पूर्ण होईल. आत्मविश्वास वाढल्यामुळे व्यावसायिकांना भरघोस नफा मिळेल आणि ते व्यवसाय वाढवण्याचा प्रयत्न करतील. नोकरदार लोकांना त्यांचं करिअर चांगलं करण्यासाठी अनेक नवीन संधी मिळतील आणि अधिकारी देखील तुमचं कौतुक करताना दिसतील. वैवाहिक जीवनाबद्दल बोलायचं झाल्यास, तुमच्या जोडीदारासोबत तुमचं नातं मजबूत राहील आणि तुम्ही एकत्र काही मालमत्ता खरेदी करू शकता. संध्याकाळी काही धार्मिक आणि सामाजिक कार्यात भाग घ्याल आणि मान वाढेल.
वृश्चिक रास (Scorpio)
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक आहे. तुमच्या गरजा पूर्ण करण्यासोबतच तुम्ही पैशाची बचत देखील करू शकाल. परदेशातून व्यवसाय करणाऱ्यांना चांगला नफा मिळेल आणि परदेशात राहणाऱ्या नातेवाईकांकडूनही चांगली बातमी मिळेल. तुम्हाला कोणत्याही जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल, तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊनही गुंतवणूक कराल. जर तुम्हाला आरोग्याशी संबंधित कोणत्याही समस्येचा सामना करावा लागत असेल तर आज तुमचं आरोग्य सुधारलेलं दिसेल आणि तुम्ही मित्रांसोबत मजा करताना दिसाल. नोकरदार लोकांना आज एखाद्या कंपनीकडून चांगली ऑफर मिळू शकते, ज्यामुळे त्यांना त्यांच्या करिअरमध्ये समाधान मिळेल. कौटुंबिक आणि वैवाहिक जीवनाबद्दल बोलायचं झाल्यास, सर्व समस्या हळूहळू दूर होतील आणि सर्वांशी तुमचे संबंध चांगले राहतील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :