Astrology 24 June 2024 : ग्रहांच्या स्थितीनुसार आजच्या दिवसांचं महत्त्व वाढलं आहे. आज सोमवार, 24 जून रोजी चंद्र मकर राशीत प्रवेश करणार आहे, त्यामुळे गुरू आणि चंद्र एकत्र आल्याने नवपंचम योग तयार होत आहे. तसेच आज ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील तृतीया तिथी असून या दिवशी ऐंद्र योग, सर्वार्थ सिद्धी योग आणि उत्तराषध नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजच्या दिवसाचं महत्त्व वाढलं आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 5 राशींना आज बनत असलेल्या शुभ योगांचा लाभ मिळेल. या भाग्यवान राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.


मिथुन रास (Gemini)


मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ आणि फलदायी असणार आहे. मिथुन राशीच्या लोकांना आज सकाळी चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे संपूर्ण दिवस चांगला जाईल. तुम्ही जीवनातील सर्व सुखसोयींचा आनंद घ्याल आणि गुंतवणुकीमुळे भविष्यात चांगला नफाही मिळेल. नोकरदार लोकांना नोकरीत प्रगतीच्या अनेक संधी मिळतील. व्यापाऱ्यांना आज नवीन व्यवसायिक ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे आणि त्यांना चांगला नफा देखील मिळेल. आईसोबत काही वाद चालू असेल तर ते आज संपतील आणि तीही तुम्हाला सहकार्य करेल. लव्ह लाईफमध्ये असलेल्यांमध्ये आज प्रेम वाढेल आणि नातेसंबंधही गोड राहतील. नवविवाहित लोकांच्या घरी आज पाहुणे येतील, ज्यामुळे घरात उत्साहाचं वातावरण असेल.


कर्क रास (Cancer)


आज कर्क राशीच्या लोकांचा दिवस प्रगतीचा असेल. कर्क राशीचे लोक आज आपली सर्व उद्दिष्टं पूर्ण करण्याचा प्रयत्न करतील आणि प्रत्येक प्रकारच्या तणावापासून दूर राहतील. भगवान शंकराच्या कृपेने आज तुम्हाला अडकलेले पैसे परत मिळतील आणि कमावलेले पैसे वाचवण्यातही तुम्हाला यश मिळेल. तुम्ही गुंतवणूक योजनांमध्ये पैसे टाकण्याचा विचार करू शकता, ज्यामुळे तुम्हाला भविष्यात चांगले फायदे देखील मिळतील. जर तुम्ही न्यायालयीन प्रकरणांमध्ये अडकले असाल तर आज तुम्हाला दिलासा मिळेल. नोकरदार आणि व्यावसायिकांचं त्यांच्या कामाबद्दल कौतुक होईल आणि नवीन प्रकल्पांवर काम करायला मिळेल. लव्ह लाईफमधील लोक त्यांच्या नात्याबद्दल घरात सांगू शकतात, तुमच्या नात्याला आज मान्यता मिळेल आणि लवकरच लग्न ठरण्याची देखील शक्यता असेल.


कन्या रास (Virgo)


कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक असणार आहे. कन्या राशीचे लोक आज वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात चांगलं संतुलन राखतील. जर तुम्हाला पैशाशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागत असेल तर आज तुम्हाला पैशाचं व्यवस्थापन करण्याचा चांगला मार्ग सापडेल. नोकरदार लोकांना आज चांगल्या संधी मिळतील, ज्यामुळे तुमच्या करिअरमध्ये प्रगती होईल. व्यवसायात तुम्ही घेतलेले निर्णय चांगला नफा मिळवून देतील आणि तुमच्या प्रतिस्पर्ध्यांना कठीण स्पर्धा देखील देतील. आज तुमच्या घरी अचानक पाहुणे येऊ शकतात, ज्यांचं तुम्ही मनापासून स्वागत कराल. घरातील लहान मुलं आज मस्ती करताना दिसतील.


वृश्चिक रास (Scorpio)


वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अनुकूल असणार आहे. वृश्चिक राशीचे लोक आज सकारात्मक उर्जेने परिपूर्ण असतील, ज्याचा प्रभाव तुमच्या विचारांवर आणि निर्णयांवर दिसून येईल. लोकांसमोर तुमची मतं ठामपणे मांडता येतील. नोकरदार लोकांचे वाईट दिवस संपतील आणि आता तुम्ही यशाकडे वाटचाल करू शकाल, ज्यामध्ये तुम्हाला तुमचे मित्र मदत करतील. जर तुम्हाला नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर आजचा दिवस चांगला असेल आणि भविष्यात तुम्हाला चांगले पैसे मिळतील. ज्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशात जायचं आहे त्यांची आजची इच्छा पूर्ण होऊ शकते. वैवाहिक जीवनाविषयी बोलायचं झालं तर, तुमच्या जोडीदारासोबत तुमचा ताळमेळ चांगला राहील आणि तुमची एकमेकांशी सकारात्मक चर्चा होईल. घरातील मुलांसोबत राहिल्याने मन शांत राहील आणि तुम्ही आनंदीही दिसाल.


कुंभ रास (Aquarius)


आजचा दिवस कुंभ राशीच्या लोकांसाठी चांगला असणार आहे. कुंभ राशीच्या लोकांना आज उत्साही वाटेल, त्यामुळे ते प्रत्येक कामात उत्साहाने सहभागी होतील. तसेच नशीब तुमच्या बाजूने असल्याने तुम्हाला अनेक क्षेत्रांतून चांगली बातमी मिळेल. धार्मिक आणि सामाजिक कार्यात भाग घेतल्याने तुमचं सोशल सर्कल वाढेल आणि तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या लोकांचं मनोरंजन देखील कराल. नोकरदार लोक आज पगारवाढीबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा करतील आणि कुठेतरी दुसरीकडे मुलाखतीला जाण्याचा विचारही करतील. व्यवसायात तुम्हाला यश मिळेल. तुम्ही तुमच्या भावा-बहिणींसोबत बाहेर जाण्याचा विचार कराल आणि धार्मिक कार्य केल्याने मानसिक शांती मिळेल. संध्याकाळी तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत मजा आणि पार्टी करण्यात थोडा वेळ घालवाल.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


हेही वाचा :


Horoscope Today 24 June 2024 : आज सोमवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य