Astrology 22 June 2024 : आज शनिवार, 22 जून रोजी चंद्र धनु राशीत भ्रमण करेल. तसेच आज ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षाची पौर्णिमा तिथी असून या तिथीला ज्येष्ठ महिना संपतो आणि आषाढ महिना सुरू होतो. ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी शुक्ल योग, ब्रह्म योग, लक्ष्मी नारायण योग आणि मूल नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजच्या दिवसाचं महत्त्व वाढलं आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार 5 राशींना आज बनत असलेल्या शुभ योगांचा लाभ मिळेल. या भाग्यवान राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.


मेष रास (Aries)


मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप खास असणार आहे. मेष राशीच्या लोकांवर आज त्यांचा कामाचा ताण कमी असेल. आज तुम्हाला जीवनात नवीन ऊर्जा आणि प्रेरणा मिळेल, ज्याचे फायदे प्रत्येक क्षेत्रात दिसून येतील. नोकरीशी संबंधित बाबींमध्ये तुमची चांगली प्रगती होईल आणि कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाची तुमच्या बॉसकडून प्रशंसा होईल. आज व्यावसायिकांना चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे आणि ते त्यांचा व्यवसाय वरच्या पातळीवर नेतील. विद्यार्थी त्यांच्या भविष्यासाठी आवश्यक कामं करतील, ज्यामुळे त्यांचं भविष्य उज्ज्वल होईल. तुमचा पैसा कुठेतरी अडकला असेल तर तो आज शनिदेवाच्या कृपेने परत येण्याची शक्यता आहे. कौटुंबिक आणि वैवाहिक जीवनाबद्दल बोलायचं तर, प्रत्येक नात्यात तुम्ही तुमचे शंभर टक्के द्याल, ज्यामुळे तुमच्या आजूबाजूचं वातावरण आनंददायी राहील.


कर्क रास (Cancer)


आजचा दिवस कर्क राशीच्या लोकांसाठी फायदेशीर असणार आहे. आज कर्क राशीच्या लोकांच्या बोलण्यात सौम्यता असेल, यामुळे तुमची मित्र संख्याही वाढेल. तसेच, कौटुंबिक परिस्थिती अनुकूल राहील, वडिलांकडून वेळोवेळी मार्गदर्शन मिळेल. आर्थिक स्थैर्य मिळवण्याच्या दिशेने काम करण्यासाठी आजचा दिवस चांगला असेल आणि जुन्या कर्जातूनही सुटका मिळेल. आजचा दिवस व्यावसायिकांसाठी चांगला असेल आणि ते त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांनाही तगडी टक्कर देऊ शकतील. नोकरी करणारे लोक मित्राच्या मदतीने आज दुसऱ्या कंपनीत मुलाखतीसाठी जाऊ शकतात. ज्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशात जायचं आहे, त्यांची इच्छा आज पूर्ण होऊ शकते. लव्ह लाईफबद्दल बोलायचं झालं तर, आज तुम्ही तुमच्या प्रियकराला अधिक वेळ द्याल, ज्यामुळे तुमचं नातं घट्ट होईल.


कन्या रास (Virgo)


आजचा दिवस कन्या राशीच्या लोकांसाठी लाभदायक आहे. आज शनिदेवाच्या कृपेने कन्या राशीच्या लोकांच्या अपूर्ण इच्छा पूर्ण होतील आणि अचानक आर्थिक लाभ झाल्यामुळे बँक बॅलन्समध्ये चांगली वाढ होईल. जर तुम्हाला जमीन किंवा फ्लॅट घ्यायचा असेल तर आज नशीब तुमच्या बाजूने असेल. वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनातील सर्व समस्या दूर होतील. जर या राशीच्या लोकांना नोकरी बदलायची असेल तर आज त्यांना इतर एखाद्या कंपनीकडून चांगली ऑफर मिळू शकते. व्यवसायात एखाद्या मोठ्या व्यक्तीच्या मदतीमुळे सर्व समस्या दूर होतील आणि नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी आजचा दिवस चांगला जाईल. तुम्ही कुटुंबाच्या सर्व गरजा पूर्ण कराल आणि कुटुंबातील सर्व सदस्यांना काही भेटवस्तू देखील देऊ शकता. धार्मिक कार्यात तुमची आवड वाढेल आणि सामाजिक कार्यात तुमची प्रतिष्ठा वाढेल.


धनु रास (Sagittarius)


आजचा दिवस धनु राशीच्या लोकांसाठी विशेष फलदायी असणार आहे. धनु राशीच्या लोकांना आज नवीन गोष्टी शिकण्याची इच्छा असेल आणि ते धर्मादाय कार्यात सक्रियपणे सहभागी होतील. लव्ह लाईफबद्दल बोलताना, तुम्ही दोघेही तुमच्या भावना एकमेकांसोबत शेअर कराल, ज्यामुळे तुमचं प्रेम फुलून जाईल आणि तुम्ही सुखाच्या क्षणांचा आनंद घ्याल. नवीन नोकरीच्या दिशेने प्रयत्न करणाऱ्यांना आज काही चांगल्या संधी मिळतील. जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर आजचा दिवस तुमच्यासाठी खूप शुभ असेल. अतिरिक्त उत्पन्नाच्या संधी तुमच्या आयुष्यात येऊ शकतात. तुमच्या मुलाच्या लग्नाची जी चिंता तुम्हाला सतावत होती ती आज संपेल असं वाटतं. आज तुम्हाला तुमच्या आई-वडिलांची सेवा करण्याची संधी मिळेल आणि संपूर्ण कुटुंबासह कुठेतरी बाहेर जाण्याचा विचार कराल.


कुंभ रास (Aquarius)


आजचा दिवस कुंभ राशीच्या लोकांसाठी आनंदाचा असणार आहे. कुंभ राशीच्या लोकांना आज नशिबाची साथ मिळेल,  तुमची आर्थिक स्थिती सुधारेल आणि सरकारी योजनांचाही लाभ मिळण्याची शक्यता आहे. आज नोकरदार लोकांची सकारात्मक विचारसरणी त्यांना कामाच्या ठिकाणी नवीन ऊर्जा देईल, अधिकारीही तुमचं कौतुक करतील. आज तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल आणि त्यांच्या समस्या सोडवण्यातही मदत कराल. तुम्ही मित्रांसोबत मजा करताना दिसाल आणि तुमचं मन मोकळं करण्यासाठी कुठेतरी बाहेर जाण्याचा विचारही कराल. आज तुमची लव्ह लाईफ फुलेल आणि तुम्हाला जुन्या भांडणांपासून आणि त्रासांपासून मुक्ती मिळेल, ज्यामुळे तुम्ही सुटकेचा नि:श्वास सोडाल. रात्री तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत एकत्रित वेळ घालवाल.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Horoscope Today 22 June 2024 : आज शनिवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य