Astrology Panchang 18 September 2024 : आज 18 सप्टेंबरचा दिवस हा फार महत्त्वाचा असणार आहे. त्याचबरोबर भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी आहे. त्याचबरोबर आजपासून पितृपक्षदेखील (Pitru Paksha) सुरु झालं आहे त्यामुळे आजच्या दिवसाचं महत्त्व फार वाढलं आहे. तसेच, आजच्या दिवशी उभयचरी योग (Yog), वृद्धि योग आणि पूर्वाभाद्रपद नक्षत्र असे अनेक शुभ संयोग जुळून येणार आहे. त्यामुळे आजच्या दिवसाचं महत्त्व फार वाढलं आहे.
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, पितृपक्षाच्या दिवशी जुळून आलेल्या या शुभ योगाचा परिणाम 5 राशींच्या लोकांवर होणार आहे. या 5 लकी राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात.
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फार खास असणार आहे. आज तुम्हाला पितरांच्या कृपेने तुमच्या बुद्धीत चांगला विकास होईल. जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी आजचा दिवस फार चांगला आहे. व्यापारी वर्गातील लोकांना आपल्या व्यवसायातून चांगला नफा मिळेल. कुटुंबात अनेक दिवसांपासून वाद सुरु असतील तर ते लवकर संपुष्टात येतील.
कन्या रास (Virgo Horoscope)
कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खास असणार आहे. आज तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होईल. अचानक धनलाभाचे संकेत आहेत. तसेच, तुमच्या आरोग्याबद्दल बोलायचं झाल्यास तुमची तब्येत अगदी ठणठणीत असेल. नोकरदार वर्गातील लोकांना नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध हो
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सकारात्मक असणार आहे. आज तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल. सकाळपासूनच तुम्हाला उत्साही वाटेल. कामानिमित्ताने तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो. धनप्राप्तीचे अनेक संकेत तुम्हाला मिळू शकतात.
मकर रास (Capricorn Horoscope)
आजचा दिवस मकर राशीच्या लोकांसाठी आनंदाचा असणार आहे. आज तुमचा बँक बॅलन्सही वाढेल. व्यवसायात पैसे कमावण्याच्या अनेक संधी उपलब्ध होतील. या राशीचे लोक ज्यांना परदेशात फिरायला जायचं आहे, त्यांची इच्छा पूर्ण होऊ शकते. आज तुम्हाला तुमच्या आईसोबत काही धार्मिक कार्यक्रमाला जाण्याची संधी मिळेल आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये एकता दिसून येईल. संध्याकाळी तुमच्या जोडीदारासोबत देवाच्या दर्शनाचा लाभ घ्याल.
मीन रास (Pisces Horoscope)
कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. कुंभ राशीचे लोक आज खर्चाचे नियोजन करून पुढे जातील आणि पैशाची बचतही करू शकतील. प्रलंबित कामं पूर्ण करावी लागतील. कुटुंबातील सदस्याकडून तुम्हाला चांगली बातमी मिळेल. काही गैरसमजामुळे कौटुंबिक वातावरण तणावपूर्ण राहील, परंतु कुटुंबातील मोठ्यांच्या पाठिंब्याने काही काळानंतर ते सामान्य होईल. संध्याकाळी एखाद्या विद्वान व्यक्तीला भेटण्याची संधी मिळेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :