Astrology Panchang 16 December 2024 : आज सोमवार, 16 डिसेंबर रोजी आठवड्याच्या पहिल्या दिवशी चंद्रापासून बाराव्या घरात गुरूच्या स्थानामुळे अनफा योग तयार होईल. तसेच आज मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील प्रतिपदा तिथी असून या दिवशी अनफा योगासह ब्रह्मयोग आणि अर्द्रा नक्षत्राचा शुभ संयोग होत असल्याने आजचं महत्त्व अधिकच वाढलं आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 5 राशींना (Zodiac Signs) या शुभ योगांचा फायदा होणार आहे, या राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.


मेष रास (Aries Horoscope Today)


मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ असणार आहे. मेष राशीचे लोक आज भगवान शंकराच्या कृपेने आरामदायी जीवन जगतील. आज तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकतो. तुम्ही पैसे वाचवण्यातही यशस्वी व्हाल. तुम्हाला कुटुंबातील एखाद्या सदस्याकडून चांगली बातमी मिळेल, ज्यामुळे तुमचं मन खूप आनंदित होईल. घरापासून दूर राहणारा सदस्य आज घरी परत येऊ शकतो, ज्यामुळे तुमचा आनंद द्विगुणित होईल. व्यवसायात नफा मिळवण्यासाठी आपण आज काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न कराल. तुमच्या जोडीदाराशी तुमचं नातं खूप घट्ट होईल आणि तुम्ही एकमेकांच्या खूप जवळ याल. 


कर्क रास (Cancer Horoscope Today)


कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंदाचा असणार आहे. कर्क राशीचे लोक आज धर्मादाय कार्यात अधिक वेळ घालवतील आणि त्यासाठी काही पैसे देखील खर्च करतील. तुम्ही नुकतीच कोणतीही गुंतवणूक केली असेल तर त्यातून तुम्हाला चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. नोकरदार लोकांचे वरिष्ठांशी चांगले संबंध राहतील. आज तुम्ही तुमच्या उपलब्ध पैशातून नवीन व्यवसाय सुरू करण्याचा प्रयत्न करू शकता, ज्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. संध्याकाळी तुम्ही कुटुंबातील सदस्यांसह काही शुभ कार्यात सहभागी होऊ शकता, जिथे तुम्ही अनेक नातेवाईकांना भेटाल.


सिंह रास (Leo Horoscope Today)


आजचा दिवस सिंह राशीच्या लोकांसाठी आशेचा नवीन किरण घेऊन आला आहे. सिंह राशीच्या लोकांना आज प्रत्येक पावलावर नशिबाची साथ मिळेल, ज्यामुळे तुमच्या मनातील अनेक इच्छा पूर्ण होतील आणि महत्वाची कामं देखील कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होतील. आज अचानक कुठूनतरी तुम्हाला एखादं माध्यम सापडेल, ज्याद्वारे तुम्ही अमाप संपत्ती कमवू शकता. विद्यार्थ्यांना अभ्यासात रस असेल, त्यामुळे ते कठोर परिश्रम करतील आणि परीक्षेत निश्चितच यश मिळेल. व्यवसायात फायद्याच्या अनेक नवीन संधी मिळतील. तुमच्या मुलांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी आज तुम्हाला चांगल्या ठिकाणी गुंतवणूक करण्याची संधी मिळेल.


तूळ रास (Libra Horoscope Today)


तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ आहे. तूळ राशीचे लोक उत्तम आरोग्यामुळे आज तंदुरुस्त राहतील. आज महादेवाच्या कृपेने एखाद्या चांगल्या ठिकाणी गुंतवणूक करून पैसे मिळवण्याची संधी मिळेल. तूळ राशीचे लोक आज व्यवसायात चांगल्या योजना आणि धोरणं बनवतील, ज्यामुळे तुम्हाला चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. राजकारणाशी संबंधित लोकांच्या सहकार्याने काही मोठा आर्थिक लाभ होऊ शकतो, ज्यामुळे कुटुंबातील सदस्यही आनंदी होतील. कुटुंबात सुख-शांती राहील. संध्याकाळची वेळ एखाद्या धार्मिक स्थळी घालवायला आवडेल.


कुंभ रास (Aquarius Horoscope Today)


कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचादिवस विशेष फलदायी असणार आहे. आज कुटुंबातील एखाद्या सदस्याचा विवाह आज निश्चित होऊ शकतो, ज्यामुळे सर्वजण खूप आनंदी दिसतील. आज गुंतवणुकीची संधी मिळाली तर नक्कीच करा, भविष्यात तुम्हाला चांगला नफा मिळेल. आज तुमचं काम सुरळीत होईल आणि मित्रांच्या मदतीने तुम्ही नवीन नोकरीच्या शोधातही असाल. आज तुमची पैसे मिळवण्याची इच्छा नक्कीच पूर्ण होईल, ज्यामुळे तुम्ही तुमच्या दैनंदिन गरजा सहज पूर्ण करू शकाल. विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घ्यायचं असेल तर त्यांच्यासाठी दिवस चांगला राहील. महत्त्वाच्या मुद्द्यांवर संध्याकाळी तुमच्या पालकांशी चर्चा करावी लागेल.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा:


Horoscope Today 16 December 2024 : आज सोमवारचा दिवस खास; सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य