Astrology 11 March 2024 : आज सोमवार, 11 मार्चला चंद्र मीन राशीत भ्रमण करणार आहे. तसेच आज फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी असून या दिवशी शुक्ल योग आणि उत्तराभाद्रपद नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजच्या दिवसाचं महत्त्व वाढलं आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 5 राशींना आज तयार होत असलेल्या शुभ योगाचा लाभ मिळेल. या 5 भाग्यवान राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊया.


वृषभ रास (Taurus)


वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक आहे. वृषभ राशीच्या लोकांना आज प्रगतीच्या संधी मिळतील. तुम्हाला कामानिमित्त परदेशात जाण्याची संधी देखील मिळू शकेल. तुमचं कौटुंबिक जीवन सुखाचं असेल, कुटुंबातील सदस्यांमध्ये सुरू असलेली तेढ दूर होईल. धार्मिक आणि सामाजिक क्षेत्राशी संबंधित लोकांचा आज एखाद्या कार्यक्रमात सन्मान केला जाईल. कठोर परिश्रम आणि प्रामाणिक प्रयत्नांमुळे तुम्हाला तुमच्या कामात यश मिळेल. तुम्हाला लव्ह लाईफमध्ये सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील आणि तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल. नोकरदार लोक आज सहकाऱ्यांच्या मदतीने आपली कामं वेळेवर पूर्ण करतील आणि पार्टी मूडमध्ये असतील.


कर्क रास (Cancer)


कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप फलदायी असणार आहे. कर्क राशीचे लोक आज मित्रांसोबत काही आनंदाचे क्षण घालवतील आणि त्यांच्यासोबत मज्जा करताना दिसतील. कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या लग्नात काही अडचण येत असेल तर आज ती दूर होऊ शकते. नोकरी करणाऱ्या लोकांना आज पदोन्नती किंवा पगारवाढ यासारखी चांगली बातमी मिळू शकते, ज्यामुळे तुम्हाला आनंद होईल. जर तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत एखादा व्यवसाय सुरू करायचा असेल तर आजचा दिवस त्यासाठी चांगला असेल. विद्यार्थी कोणत्याही स्पर्धेची तयारी करत असतील तर त्यांना त्यात चांगलं यश मिळेल. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी आजचा दिवस लाभदायक असेल, भविष्यात त्याचे चांगले परिणाम दिसून येतील.


तूळ रास (Libra)


तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ असेल. तूळ राशीच्या लोकांना आज सकाळपासून उत्साही वाटेल आणि तुम्ही तुमच्या कामातही असाच उत्साह दाखवाल. आज तुम्ही तुमची सर्व कामं सहजपणे पूर्ण करू शकाल. महादेवाच्या कृपेने तुम्हाला तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात सुरू असलेल्या सर्व समस्यांपासून आराम मिळेल आणि तुमच्या सर्व चिंता दूर होतील. धार्मिक कार्याकडे तुमचा कल वाढेल आणि तुम्ही संपूर्ण कुटुंबासह तीर्थयात्रेला जाण्याचा विचार कराल. तुम्हाला कामाच्या ठिकाणी काहीतरी नवीन शिकण्याची संधी मिळेल. तुम्ही तुमच्या मुलांना काही जबाबदाऱ्या देऊ शकता, ज्या ते पूर्ण करू शकतील. वैवाहिक जीवनात आनंद राहील आणि तुम्ही जोडीदारासोबत एकत्र मिळून काही मालमत्ता खरेदी करू शकता.


धनु रास (Sagittarius)


आजचा दिवस धनु राशीच्या लोकांसाठी इतर दिवसांपेक्षा चांगला असणार आहे. तुम्हाला तुमच्या आर्थिक परिस्थितीत स्थिरता दिसेल. काम आणि मज्जा मस्तीत संतुलन राखण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. तुम्हाला तुमच्या मुलांकडून काही चांगली बातमी मिळेल. आज तुम्हाला एखादा मित्र खूप दिवसांनी भेटायला येईल. विद्यार्थ्यांची शिकण्याची इच्छा वाढेल आणि ते अभ्यासात हुशारही होतील. कौटुंबिक शांतिमुळे मन आनंदी असेल. तुमच्या जोडीदारासोबतचं तुमचं नातं आज खूप दिवसांनी चांगलं होईल. नोकरदार लोक ऑफिसमधील मित्रांसोबत ऑफिसनंतर पार्टी करू शकतात.


मीन रास (Pisces)


मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ असणार आहे. मीन राशीचे लोक आज धार्मिक कार्यात व्यस्त असतील. तुमच्या कामामुळे आज कुटुंबीय तुमचं कौतुक करतील. भावा-बहिणीकडूनही तुम्हाला पूर्ण मदत मिळेल. तुम्ही इतरांना मदत करण्यातही पूर्ण स्वारस्य दाखवाल, ज्यामुळे लोकांच्या नजरेत तुमच्याप्रती आदर वाढेल. तुम्ही तुमच्या लव्ह लाईफमध्ये सुरू असलेले गैरसमज दूर करण्यात सक्षम असाल आणि जर तुम्ही अजूनही एकटेच असाल तर आज तुम्हाला एखादी खास व्यक्ती भेटू शकते. व्यावसायिकांसाठी आजचा दिवस चांगला असेल, आज तुमची एक चांगली डील फायनल होऊ शकते. जर तुम्ही नवीन गाडी किंवा जमीन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आज तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Horoscope Today 11 March 2024 : आजचा सोमवार खास! भोलेनाथांची 'या' राशींवर राहणार विशेष कृपा; जाणून घ्या 12 राशींचं भविष्य