Astrology Panchang 10 September 2024 : आज मंगळवार, 10 सप्टेंबर रोजी चंद्र वृश्चिक राशीत भ्रमण करणार आहे. तसेच आज भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमी तिथी असून या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग, प्रीति योग आणि अनुराधा नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजचं महत्त्व अधिकच वाढलं आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 5 राशींना (Zodiac Signs) या शुभ संयोग योगांचा फायदा होणार आहे, या राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.


मेष रास (Aries)


आजचा दिवस मेष राशीच्या लोकांना यश मिळवून देईल. आज बाप्पाच्या कृपेने मेष राशीच्या लोकांच्या अडचणी कमी होताना दिसत असून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. आज तुमची सर्व कामं सुरळीत पार पडतील, तुम्हाला तुमच्या मेहनतीचं पूर्ण फळ मिळेल. जर तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ असेल. तुम्ही कुटुंबातील सर्व सदस्यांच्या गरजा सहज पूर्ण करू शकाल आणि तुमच्या जोडीदारासोबत घरगुती वस्तू खरेदी करण्याची संधीही मिळेल. संध्याकाळचा वेळ आजूबाजूच्या लोकांशी गप्पा मारण्यात जाईल.


कन्या रास (Virgo)


कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप खास असणार आहे. कन्या राशीचे लोक आज अत्यंत कठीण कामही पूर्ण जिद्द आणि मेहनतीने चांगल्या प्रकारे पूर्ण करतील. धार्मिक कार्यात सक्रिय भाग घेतील. अडकलेले पैसे परत मिळाल्यावर आज तुम्हाला समाधान वाटेल. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांना आज चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे आणि तुमच्या जोडीदाराशी तुमचे संबंध चांगले राहतील. मुलांमुळे घरातील वातावरण आनंददायी राहील. संध्याकाळी तुमच्या जोडीदारासोबत एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देण्याची तुमची योजना असेल.


तूळ रास (Libra)


तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ असणार आहे. आज बाप्पाच्या आशीर्वादाने तूळ राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. जर तुम्हाला रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करायची असेल तर दिवस तुमच्यासाठी चांगला असेल आणि तुम्ही पैशाची बचत देखील करू शकाल. आज तुम्हाला व्यवसायात चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे आणि तुम्ही केलेले नियोजनही यशस्वी होईल. नशीब तुमच्या बाजूने असल्याने आज तुमची सर्व कामं पूर्ण होतील, ज्यामुळे तुम्ही मानसिक तणावापासून मुक्त राहाल. जोडीदारासोबतच्या नात्यात काही अडचण असेल तर ती आज संभाषणातून संपेल आणि नात्यात पुन्हा नवीनता येईल.


मकर रास (Gemini)


आजचा दिवस मकर राशीच्या लोकांसाठी शुभ असणार आहे. आज तुम्ही कुटुंबाच्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न कराल आणि तुम्हाला तुमच्या भावा-बहिणींचं पूर्ण सहकार्य मिळेल. आज नोकरदार सहकाऱ्यांसोबत चेष्टा करण्यात वेळ घालवतील. जर तुम्ही कोणतीही मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी दिवस चांगला आहे. जे लोक प्रेम जीवनात आहेत ते त्यांच्या भविष्यासाठी योजना बनवतील.


कुंभ रास (Aquarius)


आजचा दिवस कुंभ राशीच्या लोकांसाठी खास असणार आहे. आज कुंभ राशीच्या लोकांचं प्रेमळ वर्तन लोकांची मनं जिंकेल. आज तुम्हाला तुमच्या भावा-बहिणींच्या मदतीने घरातील राहिलेली कामं पूर्ण करता येतील आणि आज तुम्हाला अडकलेले पैसे मिळण्याचीही शक्यता आहे. डोळ्यांशी संबंधित कोणतीही समस्या तुम्हाला भेडसावत असेल तर ती आज नक्कीच सुधारेल. आज तुम्ही तुमच्या रागावलेल्या जोडीदाराला शांत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न कराल.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


हेही वाचा :


Horoscope Today 10 September 2024 : आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? वाचा तुमचे आजचे राशीभविष्य