Astrology Panchang 09 September 2024 : आज सोमवार, 9 सप्टेंबरला चंद्र वृश्चिक राशीत जाणार आहे. तसेच आज भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील षष्ठी तिथी असून या दिवशी रवियोग, सर्वार्थ सिद्धी योग आणि विशाखा नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजचं महत्त्व अधिकच वाढलं आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 5 राशींना (Zodiac Signs) या शुभ संयोग योगांचा फायदा होणार आहे, या राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.


मिथुन रास (Gemini)


आजचा दिवस मिथुन राशीच्या लोकांसाठी चांगला असणार आहे. मिथुन राशीचे लोक मोठे निर्णय सहजपणे घेऊ शकतील आणि तुमची फिटनेस चांगली दिसेल. जर तुम्ही आज व्यवसायात एखादा करार निश्चित केला तर भविष्यात तुम्हाला त्याचे पूर्ण फायदे मिळतील. आज तुम्हाला काही जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे आणि जुनी कर्जंही फेडू शकाल. तुम्हाला तुमच्या वडिलांकडून प्रत्येक पावलावर साथ मिळेल.


कर्क रास (Cancer)


आजचा दिवस कर्क राशीच्या लोकांसाठी खूप खास असणार आहे. कर्क राशीच्या लोकांना महादेवाच्या कृपेने आज एकापेक्षा जास्त स्त्रोतांकडून पैसे कमवण्यात यश मिळेल. तुमचा बँक बॅलन्स आणि समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल. प्रदीर्घ प्रलंबित काम पूर्ण केल्याने तुम्हाला मानसिक शांती मिळेल. विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा होईल आणि एकाग्रता राखली जाईल. वैवाहिक जीवनाबद्दल बोलायचं तर, तुमच्या जोडीदारासोबत तुम्ही समजूतदारपणाने वागाल.


सिंह रास (Leo)


सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक असणार आहे. रोजगाराच्या शोधात असलेल्या तरुणांना त्यांच्या आवडीनुसार नोकरीच्या संधी मिळतील. व्यवसाय करणाऱ्यांना आज चांगला नफा मिळेल आणि तुम्ही इतर व्यवसायात गुंतवणूक करण्याचा विचारही कराल. जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर महादेवाच्या कृपेने तुम्हाला भविष्यात चांगला नफा मिळेल. कुटुंबात सर्व सदस्यांची प्रगती पाहून तुम्हाला आनंद होईल. संध्याकाळचा वेळ घरातील मुलांसोबत घालवायला आवडेल.


धनु रास (Sagittarius)


आजचा दिवस धनु राशीच्या लोकांसाठी यशाचा ठरणार आहे. धनु राशीच्या लोकांचं आरोग्य चांगलं राहील. आज तुमच्या मित्रांची संख्या वाढेल. शेजाऱ्यांशी तुमचे संबंध चांगले राहतील आणि आजूबाजूचे वातावरणही आनंददायी राहील. जर तुम्हाला नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असेल. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांना चांगला नफा मिळेल. आज नवविवाहित लोकांच्या घरी काही खास पाहुण्यांचं आगमन होऊ शकतं. संध्याकाळचा वेळ मित्रांसोबत मजेत घालवला जाईल.


मीन रास (Pisces)


मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. मीन राशीच्या लोकांना नशिबाने साथ दिल्याने अडकलेले पैसे आज मिळतील आणि अधिक उत्पन्न मिळवण्यात धार मिळेल. आज तुम्ही तुमच्या कुटुंबासमवेत खरेदीसाठी बाहेर जाऊ शकता आणि धार्मिक कार्यासाठी पैसे खर्च करू शकता. आज काम करणाऱ्यांना अधिकारी आणि सहकाऱ्यांचं पूर्ण सहकार्य मिळेल, त्यामुळे कामं वेळेवर पूर्ण होतील. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


हेही वाचा :


Horoscope Today 09 September 2024 : आज सोमवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? वाचा तुमचे आजचे राशीभविष्य