Astrology Panchang 08 December 2024 : आज 8 डिसेंबरचा दिवस म्हणजेच रविवारचा दिवस आहे. आज मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षातील सप्तमी तिथी आहे. त्यामुळे आज दुर्धरा नावाचा योग (Yog) जुळून आला आहे. त्याचबरोबर शतभिषा नक्षत्राचा शुभ संयोग जुळून आला आहे. यामुळे आजच्या दिवसाचं महत्त्व फार वाढलं आहे.
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा परिणाम 5 राशीच्या लोकांवर होणार आहे. या राशी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात.
वृषभ रास (Taurus Horoscope)
वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खास असणार आहे. आज रविवार सुट्टीचा दिवस असल्याने तुम्ही मनसोक्त या दिवसाचा लाभ घ्याल. तसेच, दिवसभर तुमचा मूड अगदी प्रसन्न असणार आहे. कुटुंबात आनंदी वातावरण पाहायला मिळेल. तसेच, सूर्यदेवाची तुमच्यावर विशेष कृपा असणार आहे. तुमच्या व्यवसायात चांगली वाढ होईल.
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक असणार आहे. आज सूर्यदेवाच्या कृपेने दिवसभरात तुम्हाला एखादी शुभवार्ता ऐकायला मिळू शकते. तसेच, आज तुम्ही अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण करु शकता. आज तुम्ही तुमच्या पार्टनरबरोबर बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करु शकता. तुमचा व्यवसाय देखील सुरळीत चालेल. समाजात तुमचा मान-सन्मान देखील वाढलेला दिसेल.
तूळ रास (Libra Horoscope)
तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सकारात्मक असणार आहे. आज सूर्यदेवाच्या कृपेने तुमच्या सुख-सुविधांमध्ये चांगली वाढ झालेली दिसेल. तसेच, उत्पन्नाच्या अनेक संधी तुमच्यापुढे निर्माण होतील. जे व्यवसायिक आहेत त्यांना आपल्या व्यवसाय विस्ताराबाबत अधिक माहिती मिळू शकते. तसेच, लवकरच धनलाभाचे योग जुळून येणार आहेत.
धनु रास (Sagittarius Horoscope)
धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खास असणार आहे. आज तुमची सगळी महत्त्वाची कामे अगदी सुरळीतपणे पार पडतील. नोकरदार वर्गातील लोकांना नवीन नोकरी मिळण्याची शक्यता आहे. तसेच, तुमचं वैवाहिक जीवन सुरळीत चालेल. तुमच्या मनात जी इच्छा होती ती पूर्ण होईल. त्यामुळे तुम्ही खुश आणि समाधानी असाल. मित्रांचा सहवास तुमच्यासाठी फार महत्त्वाचा असेल.
मीन रास (Pisces Horoscope)
मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खास असणार आहे. आज तुमचं मन धार्मिक कार्यात जास्त रमेल.तसेच, भावा-बहिणींमध्ये चांगलं घट्ट नातं तुम्हाला पाहायला मिळेल. जर तुम्हाला बाहेर फिरायचा प्लॅन करायचा असेल तर तो तुम्ही करु शकता. तुमची व्यवसायातील प्रगती पाहून कुटुंबियांनाही तुमच्याबद्दल प्रसन्न वाटेल. त्यांना कोणतीच चिंता राहणार नाही.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: