Astrology Panchang 05 January 2024 : आज रविवार, 5 जानेवारी रोजी कुंभ राशीनंतर चंद्र मीन राशीत जाणार आहे. तसेच आज पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील षष्ठी तिथी असून या दिवशी त्रिपुष्कर योग, रवि योग आणि पूर्वाभाद्रपद नक्षत्राचा शुभ संयोग होत असल्याने आजचं महत्त्व अधिकच वाढलं आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 5 राशींना (Zodiac Signs) या शुभ योगांचा फायदा होणार आहे, या राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
वृषभ (Taurus Horoscope Today)
आजचा दिवस वृषभ राशीच्या लोकांसाठी खूप खास असणार आहे. आज सूर्यदेवाच्या कृपेने वृषभ राशीच्या लोकांमध्ये नवीन ताकद येईल आणि तुमचं आरोग्य चांगलं राहील. रविवारच्या सुट्टीमुळे तुम्ही घरातील अपूर्ण कामं पूर्ण कराल. जर तुम्हाला एखादं घर किंवा दुकान घ्यायचं असेल तर तुम्ही आज ते खरेदी करण्यात यशस्वी व्हाल. व्यवसाय करणाऱ्यांना चांगला नफा मिळेल आणि नवीन व्यावसायिक रणनीतींद्वारे चांगला नफा मिळवण्याच्या संधी मिळतील. तुमच्या जोडीदारासोबत काही वाद होत असतील तर आज बोलून ते सोडवण्याचा प्रयत्न करा.
सिंह (Leo Horoscope Today)
सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ असणार आहे. सिंह राशीच्या लोकांच्या मान-सन्मानात आज वाढ होईल आणि धार्मिक कार्यातही रस असेल. तुमचं कोणतेही प्रलंबित काम पूर्ण करून तुम्ही समाधानी व्हाल. आज काही नवीन काम केल्यास त्यात नशिबाची पूर्ण साथ मिळेल. रविवारच्या सुट्टीमुळे व्यवसायात धांदल उडेल, चांगली विक्री होऊन व्यवसायात वाढ होईल. जर तुम्हाला तुमच्या मुलांच्या आरोग्याची काळजी वाटत असेल, तर आज तुम्हाला त्यांच्या तब्येतीत सुधारणा दिसेल. तुमच्या जोडीदारासोबत चांगल्या ठिकाणी गुंतवणूक करण्याची संधीही मिळू शकेल.
तूळ (Libra Horoscope Today)
तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक असणार आहे. तूळ राशीच्या लोकांच्या सभोवतालचं वातावरण आज आनंददायी आणि प्रसन्न राहील. तुम्ही तुमच्या बोलण्याने आणि वागण्याने लोकांची मनं जिंकाल. आज सूर्याच्या प्रभावामुळे व्यापारी आपले ध्येय साध्य करण्यात तसेच इच्छित नफा मिळवण्यात यशस्वी होतील आणि नवीन व्यवसाय सुरू करण्याची संधीही मिळू शकेल. रविवारच्या सुट्टीमुळे लहान मुलं खूप धमाल करतील आणि घरी पाहुणे आल्याने नवीन पदार्थांचा आस्वादही घेतील. तुमचा पैसा कुठे अडकला असेल तर आज परत मिळण्याची शक्यता आहे.
धनु (Sagittarius Horoscope Today)
आजचा दिवस धनु राशीच्या लोकांसाठी शुभ आहे. धनु राशीचे लोक आज धार्मिक कार्यात बराच वेळ घालवतील. तसेच दानधर्म केल्याने तुमची कीर्ती वाढेल. जर तुम्ही भागीदारीत व्यवसाय करत असाल तर आज तुम्हाला चांगला नफा मिळू शकेल आणि तुम्ही व्यवसायाचा विस्तारही करू शकाल. रविवारच्या सुट्टीमुळे आज मित्रांसोबत फिरण्याची संधी मिळेल आणि कुठेतरी बाहेर जाण्याचा प्लॅनही करता येईल. जर तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असेल, तुम्हाला भविष्यात चांगला नफा मिळेल.
कुंभ (Aquarius Horoscope Today)
आजचा दिवस कुंभ राशीच्या लोकांसाठी आनंदाचा असणार आहे. कुंभ राशीचे लोक आज खूप सकारात्मक असतील आणि तुमची सर्व कामं सहज पूर्ण होतील. रविवारच्या सुट्टीमुळे कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित राहणार असून सर्वजण मिळून महत्त्वाच्या गोष्टींवर चर्चा करू शकतात. व्यवसाय करणाऱ्यांसाठी गेले काही दिवस चांगले राहिले नसतील तरी आज तुम्हाला चांगला नफा होताना दिसेल. आज तुम्ही तुमचा दैनंदिन खर्च भागवू शकाल आणि तुमच्या जोडीदारासाठी भेटवस्तू खरेदी करू शकाल. संध्याकाळचा वेळ मित्रांना भेटण्यात घालवाल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
Horoscope Today 05 January 2025 : आज रविवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य