Astrology 04 August 2024 : ग्रहांच्या स्थितीनुसार, आजचा दिवस महत्त्वाचा आहे. आज आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी असून ही तिथी दीप अमावस्या म्हणून ओळखली जाते. दीप अमावस्येच्या दिवशी रविपुष्य योग, सर्वार्थ सिद्धी योग आणि पुष्य नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजचं महत्त्व वाढलं आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज बनत असलेल्या शुभ योगांचा 5 राशींना फायदा होणार आहे, या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घ्या


वृषभ रास (Taurus)


वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी असणार आहे. वृषभ राशीचे लोक आज घरातील अपूर्ण कामं पूर्ण करतील आणि जुन्या मित्रांना भेटण्याची संधीही तुम्हाला मिळेल. तुम्ही घरातील वडिलधाऱ्यांशी महत्त्वाच्या गोष्टींवर चर्चा कराल आणि त्यांचा सल्लाही घ्याल. आज तुम्ही घरातील सुखसोयींशी संबंधित वस्तू खरेदी करू शकता, ज्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्य खूप आनंदी होतील. आज रविवारच्या सुट्टीचा व्यापाऱ्यांना चांगला फायदा होणार असून भरघोस नफा कमावण्याची संधी मिळणार आहे.


कर्क रास (Cancer)


आजचा दिवस कर्क राशीच्या लोकांसाठी सकारात्मक असणार आहे. कर्क राशीचे लोक आज रविवारची सुट्टी एन्जॉय करताना दिसतील आणि मित्रांसोबत कुठेतरी बाहेर जाण्याचा बेत आखतील. काही काम पूर्ण करण्यासाठी तुम्ही करत असलेले प्रयत्न आज सूर्यदेवाच्या कृपेने यशस्वी होतील, ज्यामुळे तुम्ही सुटकेचा नि:श्वास सोडाल. व्यापारी आज भरीव नफा कमावतील, ज्यामुळे आत्मविश्वास बळकट होईल आणि इतर व्यवसायांमध्ये गुंतवणूक करण्याची योजना तयार होईल. रविवारच्या सुट्टीमुळे कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र दिसणार असून नवीन पदार्थांचा आस्वादही घेणार आहेत. 


कन्या रास (Virgo)


कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ आणि फलदायी असणार आहे. कन्या राशीच्या लोकांच्या कुटुंबात आज आनंदाचं वातावरण असेल, जे पाहून तुम्हाला खूप आनंद वाटेल आणि तुम्ही घरासाठी काही खास खरेदी देखील करू शकता. वैवाहिक जीवनाबद्दल बोलताना, तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत गोड बोलताना दिसाल, ज्यामुळे तुमचं नातं सुधारेल.


कुंभ रास (Aquarius)


आजचा दिवस कुंभ राशीच्या लोकांसाठी उर्जेने भरलेला असेल. जर तुम्ही आधी कोणाकडून पैसे घेतले असतील तर आज तुम्हाला ते परत मिळण्याची शक्यता आहे, त्यानंतर तुम्हाला पैशाची कमतरता भासणार नाही. सामाजिक कार्यात सहभागी झाल्यामुळे तुमचा आदर वाढेल आणि अनेक खास लोकांशी तुमची ओळख वाढेल. जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर आज तुमचा मार्ग मोकळा होईल. 


मीन रास (Pisces)


आजचा दिवस मीन राशीच्या लोकांसाठी आशेचा नवीन किरण घेऊन येईल. मीन राशीच्या लोकांना आज सूर्यदेवाच्या कृपेने शत्रूंपासून मुक्ती मिळेल आणि ते आपल्या कामावर पूर्ण लक्ष केंद्रित करतील. तुम्हाला तुमचे अडकलेले पैसे आज मिळू शकतात. काही कायदेशीर वाद चालू असतील तर ते आज जवळच्या व्यक्तीच्या मदतीने मिटतील. आज तुम्ही गरजू लोकांच्या मदतीसाठी पुढे याल, ज्यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल. वडिलांच्या सहकार्याने आज काही महत्त्वाची कामं पूर्ण होतील. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


हेही वाचा :


Horoscope Today 04 August 2024 : आज रविवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य