Astrology Panchang 01 September 2024 : आज रविवार, 1 सप्टेंबरला चंद्र हा सिंह राशीत जाणार आहे. आज सूर्य शनि समसप्तक योग तयार होत आहे, याचा विशेष लाभ काही राशींना होणार आहे. मिथुनसह इतर 5 राशींसाठी आजचा दिवस शुभ असणार आहे. 


मेष रास (Aries)


आजचा दिवस मेष राशीच्या लोकांसाठी अतिशय शुभ असणार आहे. मेष राशीच्या लोकांना सप्टेंबरच्या पहिल्या दिवशी जुन्या मित्राला भेटण्याची संधी मिळेल. आज तुम्ही रिलॅक्स मूडमध्ये असाल आणि रविवारच्या सुट्टीमुळे तुम्ही मित्रांसोबत मज्जा करण्याच्या मूडमध्ये असाल. आज घरी पाहुणे येऊ शकतात. आज तुम्ही घरी खमंग पदार्थांचा आनंद घ्याल. जर तुम्ही आधीच कर्जात बुडाले असाल तर तुम्हाला कर्ज फेडण्याचा मार्ग मिळेल आणि इतर स्त्रोतांकडून पैसे कमवण्याची संधी मिळेल. तुमच्या जोडीदारासोबत काही वाद चालू असतील तर ते आज संपतील.


मिथुन रास (Gemini)


मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. मिथुन राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती सप्टेंबरच्या पहिल्या दिवशी मजबूत आणि स्थिर असेल. तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये अनेक उत्तम संधी मिळतील. व्यवसाय करणारे आज चांगला नफा कमावतील आणि त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांना टफ फाईट देतील. नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना आज चांगली बातमी मिळू शकते. जर कुटुंबात काही तणाव चालू असेल तर तो आज संपेल आणि सर्व सदस्यांशी तुमचे संबंध चांगले राहतील.


सिंह रास (Leo)


सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस उत्साहाचा असणार आहे. सिंह राशीच्या लोकांना सप्टेंबरच्या पहिल्या दिवशी सूर्यदेवाच्या आशीर्वादाने पैसा आणि संपत्ती मिळेल, उत्पन्नाचे नवीन मार्ग देखील उघडू शकतात. कुटुंबाच्या प्रत्येक गरजा पूर्ण करण्यात तुम्ही पुढे असाल. व्यवसायात पैसे कमवण्याचे नवीन मार्ग तयार होतील आणि तुम्ही इतर व्यवसायातही गुंतवणूक करू शकता. तसेच, आज तुम्ही तुमच्या कल्पनांद्वारे कौटुंबिक व्यवसायाला पुढे नेण्याचं काम करू शकता, ज्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्य खूप आनंदी दिसतील. संध्याकाळचा वेळ घरातील लहान मुलांसोबत घालवायला आवडेल.


धनु रास (Sagittarius)


धनु राशीच्या लोकांसाठी आजच दिवस लाभदायक राहील. धनु राशीच्या लोकांचं अपूर्ण काम आज पूर्ण होईल, ज्याची तुम्ही खूप दिवसांपासून वाट पाहत होता. आज तुमचं आरोग्य चांगलं राहील. अविवाहित लोकांना आज एखाद्या खास व्यक्तीशी बोलण्याची संधी मिळेल, ज्याला तुम्ही पुढे भेटू शकता. या राशीचे लोक ज्यांना नोकरी बदलायची आहे त्यांना आज या संदर्भात महत्त्वाची माहिती मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांना आज सूर्यदेवाच्या कृपेने जास्त नफा मिळण्याची शक्यता आहे. भावा-बहिणींसोबत काही मतभेद असतील तर ते आज संपुष्टात येईल आणि नाती पुन्हा घट्ट होतील. 


मकर रास (Capricorn)


मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस नवीन आशेचा किरण घेऊन येत आहे. मकर राशीचे लोक आज मजेशीर मूडमध्ये असतील आणि त्यांना मित्रांसोबत कुठेतरी फिरण्याची संधी मिळेल. जर कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या लग्नात काही अडथळे येत असतील तर आज एखाद्या वृद्ध व्यक्तीच्या मदतीने लग्नाचा प्रस्ताव मंजूर होऊ शकतो. यश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना एकाग्रतेने आणि अधिक मेहनत करावी लागेल, तरच ते यश मिळवू शकतील.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


हेही वाचा :


Horoscope Today 01 September 2024 : आज रविवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? वाचा तुमचे आजचे राशीभविष्य