Astrology May 2025 Horoscope : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, मे 2025 ची सुरुवात आजपासून झाली आहे. या मे महिन्यात काही ग्रहांची युती होणार आहे. याचा परिणाम अनेक राशींवर होणार आहे. मे महिन्यात मीन राशीत शनी (Shani Dev)आणि राहूची (Rahu) युती होणार आहे. याचा परिणाम काही राशींच्या लोकांवर पाहायला मिळणार आहे. 

ज्योतिष शास्त्रानुसार, राहू ग्रह सध्या मीन राशीत विराजमान आहे. तर, शनीचं संक्रमण 29 मार्च रोजी मीन राशीत झालेलं आहे. राहू ग्रहाचं संक्रमण 18 मे 2025 रोजी मीन राशीतून कुंभ राशीत होणार आहे. 18 मे पर्यंत मीन राशीत शनी आणि राहूची युती होऊन पिसाच योग निर्माण होणार आहे. 

काय असतो पिशाच योग?

ज्योतिष शास्त्रानुसार, राहू आणि शनीची युती जेव्हा एखाद्या ग्रहात होते तेव्हा पिशाच योग निर्माण होतो. शनी आणि राहू हे दोन्ही छाया ग्रह आहेत. या ग्रहामुळे पिशाच, भूत, प्रेत यांचा भास निर्माण होतो. तसेच, याच्या पिडीत राशींना अनेक संकटांचा सामना करावा लागतो. त्यामुळेच हा योग फार अशुभ मानण्यात आला आहे. 

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीच्या लोकांसाठी शनी आणि राहूच्या युतीचा हा योग फार कष्टायचा ठरणार आहे. या काळात तुम्हाला आर्थिक संकटांचा सामना करावा लागू शकतो. तसेच, खर्चावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. या काळात कोणाशीही वादविवाद घालू नका. तसेच, वाणीवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. 

मिथुन रास (Gemini Horoscope)

मिथुन राशीच्या लोकांसाठी राहू आणि शनीची युती फार संकटाची ठरणार आहे. या काळात तुम्हाला मानसिक ताणतणावाचा सामना करावा लागू शकतो. तसेच, या कालावधीत कोणतेच महत्त्वाचे निर्णय 18 मेपर्यंत घेऊ नका. त्यानंतर महत्त्वाच्या कामांना प्रोत्साहन द्या. 

सिंह रास (Leo Horoscope)

सिंह राशीच्या लोकांसाठी शनी आणि राहूची युती फार कठीण ठरणारी आहे. या काळात तुम्हाला पैशांची कमतरता भासू शकते. तसेच, तुमच्या खर्चात देखील वाढ होऊ शकते. यामुळे तुम्हाला अनेक संकटांचा सामना करावा लागू शकतो. या दरम्यान तुमच्या आई-वडिलांबरोबर देखील कोणत्याच कारणांवरुन वाद घालू नका. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Shani Dev : आपल्या घरातील आजोबांप्रमाणेच असतो शनी, शनीची साडेसाती म्हणजे एक सुवर्णसंधीच; राशीचक्रकार शरद उपाध्ये सांगतात...