Astrology : 'ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून व्यक्तीचे भविष्य जाणून घेतले जाते. प्रत्येकाला ज्योतिषांकडून भविष्य जाणून घ्यायचे असते. पण सामान्यतः विचारला जाणारा प्रश्न म्हणजे 'जुळ्या मुलांची जन्मपत्रिका एकसारखी असते, तर त्यांच्या नशिबात फरक का?' जाणून घ्या (Twins Child Astrology)



जुळ्या मुलांच्या नशिबात फरक


ज्योतिषशास्त्रानुसार असे म्हटले जाते की, कर्माच्या तत्त्वामुळे जुळ्या मुलांच्या नशिबात फरक असतो. माणसाला त्याच्या कर्माचे फळ पुढच्या जन्मी भोगावे लागते. हीच गोष्ट जुळ्या मुलांना लागू होते. त्यांच्या जन्मवेळेत काही मिनिटांचा फरक असला तरी त्यांच्याकडून केलेले कर्म त्यांना वेगवेगळ्या दिशेने घेऊन जातात.


 


जुळ्या मुलांची कुंडली हा महत्त्वाचा विषय


खरं तर जुळ्या मुलांची कुंडली हा महत्त्वाचा विषय आहे. प्रत्यक्ष पाहिल्यास दोघांच्या कुंडली तशा सारख्याच दिसतात, त्यांच्या जन्माच्या वेळेत फारसा फरक नसतो. मात्र असे असले तरी त्यांच्या नशिबाच्या फरकामुळे दोन्ही मुलांच्या आयुष्याची स्थिती आणि दिशा भिन्न आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार, जुळ्या मुलांच्या कुंडलीचा अभ्यास विशेष प्रकारे करण्यात येतो



जुळ्या मुलांच्या कुंडलीत या गोष्टी सारख्याच असतात
जुळ्या मुलांच्या पत्रिकेत विशेषत: जन्मस्थान, जन्मतारीख आणि दिवस सारखेच असतात. पण मुलांच्या दिसण्यात, विचारांमध्ये, इच्छांमध्ये आणि घटनांमध्ये फरक असतो. एवढेच नाही तर दोघांचे व्यक्तिमत्वही वेगळे असते.


 


जुळ्या मुलांची कुंडली कशी पाहावी?


ज्योतिषशास्त्रानुसार, जुळ्या मुलांची कुंडली पाहणे तसे सोपे काम नाही, कारण जन्मस्थान, जन्मतारीख इत्यादी अनेक गोष्टी सारख्याच असतात. म्हणूनच जुळ्या मुलांची कुंडली तयार करताना जन्म पत्रिकेसोबत गर्भधारणा पत्रिकाही तयार केली जाते.


 


गर्भ पत्रिका आणि जन्म पत्रिका यातील फरक


जन्म पत्रिका गर्भ पत्रिकापेक्षा वेगळी असते. जुळ्या मुलांचे भविष्य कुंडलीवरून सहज कळू शकते. गर्भ पत्रिका केवळ गर्भधारणेची वेळ लक्षात घेऊन तयार केली जाते. पण ते खूप अवघड काम आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार जुळ्या मुलांची कुंडली गर्भधारणेनुसार बनवली तर जुळ्या मुलांचे जीवन आणि भविष्यातील बदल सहज समजू शकतात.


 


गर्भधारणेची वेळ जाणून घेणे का महत्त्वाचे आहे?


असे म्हटले जाते की मुलावर आणि विशेषतः आईवर पालकांचा संपूर्ण प्रभाव असतो. कारण बाळाला संपूर्ण 9 महिने आईच्या उदरात आसरा मिळतो. असे मानले जाते की, ज्या वेळी महिलेची गर्भधारणा होते, त्या वेळी ब्रह्मांडातील नक्षत्रांची मांडणी आणि ग्रहांची स्थिती यांचाही मुलाच्या जन्मावर परिणाम होतो. यामुळेच शास्त्रात गर्भधारणेचा शुभ काळ महत्त्वाचा मानला जातो. गर्भधारणेचा दिवस, वेळ, तिथीनुसार, नक्षत्र, चंद्राची स्थिती आणि जोडप्याची कुंडली तपासल्यानंतर गर्भधारणेचा मुहूर्त ठरवला जातो.


 


यामुळे जुळ्या मुलांचे भविष्य सारखे नसते


वैदिक ज्योतिषापासून तयार करण्यात आलेल्या पद्धतीमध्ये नक्षत्र आणि उपनक्षत्रांच्या आधारे ग्रहांचे परिणाम मोजले जातात. यानुसार जुळ्या मुलांची जन्मतारीख एकच असू शकते, परंतु वेळेत फरक आहे. असं म्हटलं जातं, जुळ्या मुलांच्या जन्मात 3 मिनिटांपासून 10 किंवा 12 मिनिटांचा फरक असू शकतो, या दरम्यान, लग्न राशी आणि ग्रहांच्या राशींमध्येही बदल होतो. कारण ज्योतिष शास्त्रानुसार या काळात नक्षत्रांचे स्वामी देखील बदलतात. या फरकामुळे एकाच नक्षत्रात जन्मलेल्या जुळ्या मुलांच्या नक्षत्रांच्या राशीत फरक असू शकतो. या सूक्ष्म गणनेनुसार, जुळ्या मुलांच्या पत्रिका देखील भिन्न असतात. त्यांचे वर्तन आणि भविष्य देखील एकसारखे राहणार नाही.


 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


इतर बातम्या


Chanakya Niti : चाणक्यांच्या मते, पती-पत्नीच्या नात्यात कधीही येऊ देऊ नका 'ही' गोष्ट, नात्याचा होईल विनाश!