Dhanteras 2022 : दिवाळी (Diwali 2022) हा हिंदूंचा सर्वात मोठा सण मानला जातो. दिवाळी हा सण 5 दिवस साजरा केला जातो. दिवाळीच्या सणाची सुरुवात धनत्रयोदशीने होते. हिंदू कॅलेंडरनुसार, धनत्रयोदशी दरवर्षी कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला साजरी केली जाते. या दिवशी भगवान धन्वंतरी यांचा जन्म झाला असे मानले जाते. धनत्रयोदशीला सोने, चांदी, दागिने आणि भांडी खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. धनत्रयोदशीला खरेदी केलेल्या वस्तू तेरा पटींनी वाढतात अशी पौराणिक मान्यता आहे. धनत्रयोदशीला भगवान धन्वंतरी, भगवान कुबेर यांच्यासह लक्ष्मीची पूजा केली जाते. या दिवशी घरोघरी दिवे लावले जातात. यावेळी दिवाळी 24 ऑक्टोबरला साजरी होणार असली तरी धनत्रयोदशीच्या तारखेबाबत 22 की 23 ऑक्टोबरला साजरी करावी? याबाबत मतभेद आहेत. जाणून घेऊया धनत्रयोदशीची तिथी, शुभ मुहूर्त आणि महत्त्व..


धनत्रयोदशी कधी असते?


कार्तिक महिन्याची त्रयोदशी तिथी 22 ऑक्टोबर 2022 रोजी संध्याकाळी 06.02 वाजता सुरू होत आहे आणि 23 ऑक्टोबर 2022 रोजी त्रयोदशी तिथीच्या संध्याकाळी 06.03 वाजता समाप्त होईल. अशा स्थितीत यावेळी दोन्ही दिवशी धनत्रयोदशीचा साजरी केली जाणार आहे.


23 तारखेला दिवसभर 'हा' सर्वार्थसिद्धी योग 
शास्त्रानुसार  त्रयोदशीलाच दिवा दान करावा. धनत्रयोदशीला सायंकाळी कुबेर-लक्ष्मीची पूजा केली जाते. त्यामुळे त्रयोदशी तिथी सायंकाळची असल्याने धनत्रयोदशी 22 ऑक्टोबरलाच साजरी केली जाईल. दुसरीकडे, खरेदीचे इतर शुभ कार्य देखील 22 आणि 23 ऑक्टोबर रोजी केले जाऊ शकतात. तर धन्वंतरी जयंती उदयकालिक त्रयोदशी तिथीला साजरी केली जाते, म्हणून 23 ऑक्टोबर रोजी धन्वंतरी जयंतीला भगवान धन्वंतरीची पूजा केली जाईल. 23 तारखेला दिवसभर सर्वार्थसिद्धी योग राहील. त्यामुळे सर्व प्रकारची खरेदी, गुंतवणूक आणि नवीन सुरुवात करण्यासाठी संपूर्ण दिवस शुभ राहील. अशा प्रकारे 22 आणि 23 व्या दिवशी धनत्रयोदशी साजरी केली जाईल. 22 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी यमाला प्रसन्न करण्यासाठी दिवे दानही केले जातील. पाच दिवस चालणाऱ्या या महोत्सवाला आजपासून सुरुवात होणार आहे.


धनत्रयोदशीचा खरेदीसाठी शुभ मुहूर्त


कोणतेही शुभ कार्य शुभ काळात केले तर त्यातून मिळणारे लाभ आपोआप वाढतात. त्यामुळे कोणत्या शुभ मुहूर्तावर धनत्रयोदशीची खरेदी करून जास्तीत जास्त फायदा मिळवता येईल, शुभ काळ 23 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 05:43 ते 07:19 पर्यंत राहील. यानंतर सायंकाळी 07:19 ते 08:54 या वेळेत अमृतकाळ सुरू होईल. धनत्रयोदशीच्या खरेदीसाठी संध्याकाळी 05:43 ते रात्री 10:30 पर्यंतचा काळ शुभ आहे. यावेळी धनत्रयोदशीची खरेदी जोरदार करावी.


धनत्रयोदशीच्या दिवशी मुख्य गेटवर 13 दिवे लावा
ज्या घरामध्ये धनत्रयोदशीच्या दिवशी यमराजासाठी दिवा लावला जातो. असे म्हणतात की, की तिथे अकाली मृत्यू होत नाही, धनत्रयोदशीच्या संध्याकाळी घरात फक्त 13 दिवे लावावेत. यमराजाला प्रसन्न करण्यासाठी घराबाहेर दक्षिणाभिमुख दिवा लावावा. वास्तविक दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते. असेही मानले जाते की या दिवशी घरात दिवा लावल्याने सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होते.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


संबंधित बातम्या


Dhanteras 2022: धनत्रयोदशीच्या दिवशी 'या' चुका करू नका, नाहीतर वर्षभर आर्थिक चणचण भासेल