Astrology: 2026 वर्षाचा सध्या 5 वा महिना सुरू आहे, ज्योतिषशास्त्रानुसार, 2026 हे वर्ष ग्रह-संक्रमणाच्या दृष्टीकोनातून अत्यंत खास आहे, या काळात मोठ-मोठ्या ग्रहांच्या संक्रमणाचा परिणाम सर्व राशींवर पाहायला मिळणार आहे. जून ते डिसेंबर 2026 हा काळ अनेक राशींसाठी मोठे बदल आणू शकतो. ग्रहांच्या राशीबदलामुळे व्यक्तीच्या आर्थिक, करिअर आणि प्रेम जीवनात मोठे बदल सुरू होण्याची शक्यता दिसते.. जाणून घेऊया मेष ते कन्या राशींना पुढचे 7 महिने कसे जाणार? जाणून घ्या...
तूळ रास (Libra Weekly Horoscope)
तूळ राशीसाठी जूनपासून तुमच्या आयुष्यात अनेक सकारात्मक बदलांची सुरुवात होऊ शकते. करिअरमध्ये नवीन संधी, नवीन लोकांशी ओळखी आणि आर्थिक लाभाचे योग तयार होतील. विशेषतः ऑगस्ट ते ऑक्टोबर हा काळ नोकरी आणि व्यवसायासाठी अनुकूल राहू शकतो. काही अपूर्ण कामे पूर्ण होतील. प्रेमसंबंधांमध्ये जवळीक वाढेल, पण भावनिक निर्णय घाईत घेऊ नका. नोव्हेंबरनंतर खर्च वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे आर्थिक नियोजन महत्त्वाचे ठरेल.
वृश्चिक रास (Scorpio Weekly Horoscope)
वृश्चिक राशीसाठी हा काळ परिवर्तनाचा ठरणार आहे. जून-जुलैमध्ये मानसिक ताण आणि निर्णयांमध्ये संभ्रम राहू शकतो, पण सप्टेंबरनंतर परिस्थिती वेगाने सुधारेल. करिअरमध्ये तुमच्या मेहनतीची दखल घेतली जाईल. अचानक धनलाभ, अतिरिक्त उत्पन्न किंवा नवीन प्रोजेक्टची संधी मिळू शकते. प्रेमजीवनात जुने गैरसमज दूर होतील. काही लोकांना स्थलांतर किंवा नवीन नोकरीचे योग दिसू शकतात. आरोग्याच्या बाबतीत थकवा आणि झोपेची समस्या दुर्लक्षित करू नका.
धनु रास (Saggitarius Weekly Horoscope)
धनु राशीसाठी जून ते सप्टेंबर हा काळ मेहनतीचा असेल, पण त्याचे चांगले फळ ऑक्टोबरनंतर मिळू लागेल. नोकरीत पदोन्नती किंवा जबाबदारी वाढण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन संपर्कांमुळे फायदा होईल. परदेशाशी संबंधित कामे किंवा प्रवासाचे योग तयार होतील. कौटुंबिक वातावरणात काही चढ-उतार येऊ शकतात, विशेषतः जुलैमध्ये संयम आवश्यक असेल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ प्रगतीचा राहील. डिसेंबरमध्ये आर्थिक स्थिती अधिक मजबूत होऊ शकते
मकर रास (Capricorn Weekly Horoscope)
मकर राशीसाठी या काळात तुम्ही स्थिरता आणि प्रगती अनुभवू शकता. जून-जुलैमध्ये कामाचा ताण वाढेल, पण त्यातूनच मोठी संधी मिळू शकते. नवीन गुंतवणूक किंवा मालमत्तेशी संबंधित निर्णय फायदेशीर ठरू शकतात. सप्टेंबरनंतर आर्थिक स्थितीत सुधारणा दिसेल. कुटुंबातील वडीलधाऱ्यांचे सहकार्य महत्त्वाचे ठरेल. काही लोकांना नोकरीत बदल किंवा नवीन शहरात जाण्याची संधी मिळू शकते. प्रेमसंबंधांमध्ये प्रामाणिक संवाद आवश्यक राहील.
कुंभ रास (Aquarius Weekly Horoscope)
कुंभ राशीसाठी हा काळ तुमच्या आयुष्यात नवीन कल्पना आणि नवीन दिशा घेऊन येऊ शकतो. करिअरमध्ये क्रिएटिव्ह क्षेत्रातील लोकांना मोठी संधी मिळेल. जून ते ऑगस्टदरम्यान काही कामे अपेक्षेपेक्षा हळू पूर्ण होतील, पण संयम ठेवल्यास यश मिळेल. आर्थिक स्थिती हळूहळू सुधारेल. प्रेमसंबंधांमध्ये अहंकार टाळणे गरजेचे राहील. मित्रांकडून मोठे सहकार्य मिळू शकते. नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये अचानक शुभ बातमी मिळण्याची शक्यता आहे.
मीन रास (Pisces Weekly Horoscope)
मीन राशीसाठी हा काळ भावनिक आणि आध्यात्मिक प्रगतीचा ठरू शकतो. अनेक जुने प्रश्न हळूहळू सुटताना दिसतील. आर्थिक स्थिती स्थिर राहील, पण मोठे खर्च टाळावेत. करिअरमध्ये नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. जुलै आणि ऑगस्टमध्ये भावनिक तणाव वाढू शकतो, त्यामुळे स्वतःसाठी वेळ काढणे आवश्यक राहील. प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनात जवळीक वाढेल. डिसेंबरमध्ये भाग्याची साथ अधिक मिळेल.
हेही वाचा
