Astrology: भगवान शिव.. ज्यांचे केवळ नाव घेताच मन:शांती मिळते.. भगवान शंकर यांना जगत्पिता म्हटले जाते, त्याचप्रमाणे हिंदू धर्मात 12 ज्योतिर्लिंगांना अत्यंत पवित्र मानले जाते, ही ती ठिकाणे आहेत जिथे स्वतः भगवान शिव प्रकट झाले. शिवपुराणानुसार, त्यांच्या दर्शनाने पापे धुतली जातात, मनःशांती आणि मोक्ष प्राप्त होतो. ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक राशीचा स्वभाव, ग्रह आणि ऊर्जा वेगळी असते. त्यामुळे त्या-त्या राशीच्या व्यक्तींनी विशिष्ट ज्योतिर्लिंगाला भेट दिल्यास अधिक आध्यात्मिक लाभ मिळतो असे मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार, आयुष्यात लाभ, आरोग्य, संपत्ती आणि शिवाचा अनंत आशीर्वाद मिळवण्यासाठी कोणत्या राशीच्या व्यक्तीने कोणत्या ज्योतिर्लिंगाला भेट द्यावी, हे जाणून घ्याच...

12 राशींचा संबंध 12 ज्योतिर्लिंगांशी! शिवपुराणातील उल्लेख...(12 Jyotirlingas 12 Zodiac Signs)

शिवपुराणात असे म्हटले आहे की जे या बारा ज्योतिर्लिंगांना भेट देतात त्यांना मोक्ष प्राप्त होतो. शिवपुराणातील कोटिरुद्र संहितेमध्ये शिवाच्या बारा ज्योतिर्लिंगांचे वर्णन आहे. ही सर्व ज्योतिर्लिंगे प्राचीन आहेत. असे मानले जाते की शिव स्वतः या प्रत्येक ज्योतिर्लिंगात वास करतात. अनेक भक्तांचा असा विश्वास आहे की ज्योतिर्लिंगांना भेट दिल्याने आरोग्य, संपत्ती आणि मोक्षाचा मार्ग खुला होतो. ज्योतिर्लिंगांची पूजा, विशेषतः महाशिवरात्री, श्रावण महिना आणि सोमवारी केल्याने विशेष लाभ मिळतो. ज्योतिषशास्त्रानुसार, असे म्हटले जाते की राशीनुसार या ज्योतिर्लिंगांना भेट दिल्याने विशेष लाभ मिळतो. जाणून घेऊया की कोणत्या राशीच्या लोकांनी कोणत्या ज्योतिर्लिंगाला भेट द्यावी?

मेष (Aries)

ज्योतिषशास्त्रानुसार, मंगळ ग्रह मेष राशीचा स्वामी आहे. या राशीत जन्मलेल्या व्यक्तींनी रामेश्वरम ज्योतिर्लिंगाला अवश्य भेट द्यावी. हे ज्योतिर्लिंग तामिळनाडूतील रामेश्वरम येथे आहे. मंगळ ग्रहाचा प्रभाव असल्याने येथे जाऊन ऊर्जा आणि धैर्य वाढते.

वृषभ (Taurus)

ज्योतिषशास्त्रानुसार, शुक्र ग्रह वृषभ राशीचा स्वामी आहे. या राशीत जन्मलेल्या व्यक्तींनी सोमनाथ ज्योतिर्लिंगाला अवश्य भेट द्यावी. हे गुजरातमध्ये आहे. शुक्र ग्रहामुळे सुख-समृद्धी आणि स्थैर्य मिळते.

मिथुन (Gemini)

ज्योतिषशास्त्रानुसार, बुध ग्रह मिथुन राशीचा स्वामी आहे. या राशीत जन्मलेल्या व्यक्तींनी गुजरातमध्ये असलेल्या नागेश्वर ज्योतिर्लिंगाला अवश्य भेट द्यावी. बुध ग्रहासाठी बुद्धी आणि संवाद कौशल्य वाढते.

कर्क (Cancer)

ज्योतिषशास्त्रानुसार, चंद्र ग्रह कर्क राशीचा स्वामी आहे. या राशीत जन्मलेल्या व्यक्तींनी मध्य प्रदेशात असलेल्या ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाला अवश्य भेट द्यावी. चंद्राच्या प्रभावामुळे मानसिक शांती आणि आरोग्य लाभते.

सिंह (Leo)

ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्य ग्रह सिंह राशीचा स्वामी आहे. या राशीत जन्मलेल्या व्यक्तींनी झारखंडमधील वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाला अवश्य भेट द्यावी. सूर्याच्या राशीसाठी प्रतिष्ठा आणि आध्यात्मिक शक्ती मिळते.

कन्या (Virgo)

ज्योतिषशास्त्रानुसार, कन्या राशीचा स्वामी ग्रह बुध आहे. या राशीत जन्मलेल्या व्यक्तींनी आंध्र प्रदेशातील श्रीशैलम मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाला अवश्य भेट द्यावी. बुध ग्रहामुळे दोष निवारण आणि पवित्रता मिळते.

तूळ (Libra)

ज्योतिषशास्त्रानुसार, तूळ राशीचा स्वामी ग्रह शुक्र आहे. या राशीत जन्मलेल्या व्यक्तींनी मध्य प्रदेशातील उज्जैन येथील महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाला अवश्य भेट द्यावी. शुक्र राशीसाठी जीवनातील संतुलन आणि शांती मिळते.

वृश्चिक (Scorpio)

ज्योतिषशास्त्रानुसार, वृश्चिक राशीचा स्वामी ग्रह मंगळ आहे. या राशीत जन्मलेल्या व्यक्तींनी महाराष्ट्रातील घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाला अवश्य भेट द्यावी. मंगळ आणि केतू प्रभावामुळे आध्यात्मिक शक्ती वाढते.

धनु (Sagittarius)

ज्योतिषशास्त्रानुसार, धनु राशीचा स्वामी ग्रह गुरू आहे आणि या राशीत जन्मलेल्या व्यक्तींनी उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंगाला अवश्य भेट द्यावी. गुरु ग्रहामुळे धर्म, भाग्य आणि पुण्य मिळते.

मकर (Capricorn)

ज्योतिषशास्त्रानुसार, मकर राशीचा स्वामी शनि आहे. या राशीत जन्मलेल्या व्यक्तींनी महाराष्ट्रातील भीमाशंकर ज्योतिर्लिंगाला अवश्य भेट द्यावी. शनि ग्रहामुळे कर्मसिद्धी आणि अडथळे दूर होतात.

कुंभ (Aquarius)

ज्योतिषशास्त्रानुसार, कुंभ राशीचा स्वामी शनी आहे. या राशीत जन्मलेल्या व्यक्तींनी उत्तराखंडमधील केदारनाथ ज्योतिर्लिंगाला अवश्य भेट द्यावी. शनि आणि राहू प्रभावामुळे नकारात्मक ऊर्जा कमी होते.

मीन (Pisces)

ज्योतिषशास्त्रानुसार, मीन राशीचा स्वामी गुरू आहे आणि या राशीत जन्मलेल्या व्यक्तींनी महाराष्ट्रातील त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाला अवश्य भेट द्यावी. गुरु ग्रहामुळे आध्यात्मिक प्रगती आणि शांती मिळते.

ही वाचा

Shani Dhaiyya 2026: साडेसाती सोडा, 'शनि ढैय्या' भल्याभल्यांना कंगाल करते! सध्या 2 राशींवर प्रभाव, नोकरीपासून-लग्नापर्यंत परिणाम, कमी लोकांना माहित...

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)