Aries Horoscope Today 7 May 2023 : मेष राशीच्या (Aries Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. नोकरदार (Employees) लोकांना नोकरीत प्रगतीची संधी मिळेल. तुम्ही धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हाल, थोडा वेळ आणि काही पैसा खर्च कराल, ज्यामुळे तुमच्या मनाला शांती मिळेल. नोकरीत (Job) बदल होण्याची शक्यता आहे. बेरोजगारांना चांगला रोजगार मिळण्याचे संकेत आहेत. आज सावध राहण्याची गरज आहे. तुम्ही काही कायदेशीर प्रकरणात अडकू शकता. मालमत्तेबाबत सुरू असलेली समस्या दूर होण्याची शक्यता आहे. अनोळखी लोकांपासून सावध रहा. कोणाच्याही सल्ल्याने गुंतवणूक (Investment) करू नका. तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच गुंतवणूक केली तर बरे होईल. कुटुंबाचे (Family) सहकार्य मिळेल. कुटुंबातील सदस्यांसोबत थोडा वेळ घालवा. जे विद्यार्थी स्पर्धेची तयारी करत आहेत, त्यांच्या मेहनतीला यश येईल. उच्च शिक्षणासाठी काळ चांगला आहे. 


मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस करिअरच्या दृष्टीने खूप वेगवान असेल. आज तुमच्या व्यवसायात (Business) फायदा होईल. कुटुंबात आनंद येईल. आज तुमचे सहकारी कोणत्याही महत्त्वाच्या कामात तुमचा सल्ला घेऊ शकतात. कामाशी संबंधित कामात निर्णय घेण्यापूर्वी प्रत्येक गोष्टीची चौकशी करा. नोकरदार वर्गातील लोकांनी खोटी आश्वासने देणे टाळावे. आज, एकापेक्षा जास्त स्त्रोतांमधून मिळणारे उत्पन्न तुमचा आत्मविश्वास वाढवतील. 


आज मेष राशीचे कौटुंबिक जीवन 


आज कुटुंबात धार्मिक वातावरण राहील. तसेच, घरात पूजा, पाठ यांसारख्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल. यामुळे तुमचं मन प्रसन्न राहील. धार्मिक स्थळ किंवा देवाच्या दर्शनासाठी तुम्ही जवळपासच्या ठिकाणाला भेट देऊ शकता. एकंदरीतच कुटुंबाबरोबर आजचा दिवस छान जाईल.


आज मेष राशीचे आरोग्य 


मेष राशीच्या लोकांनी खाण्यापिण्याच्या बाबतीत गाफील राहू नका आणि बाहेरचे खाणे टाळा, नाहीतर पोटदुखीची समस्या उद्भवू शकते.


मेष राशीसाठी आजचे उपाय 


आज मंदिरात लाल रंगाची फळे दान करा आणि गायीला गूळ खाऊ घाला.


मेष राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग


मेष राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग लाल आहे. तर, मेष राशीसाठी आजचा लकी नंबर 8 आहे. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


महत्त्वाच्या बातम्या : 


Horoscope Today 7 May 2023 : आजचा रविवार 'या' राशीसाठी लाभदायक! जाणून घ्या सर्व 12 राशींचे राशीभविष्य