Ardhakendra Yog 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, नवग्रह एक ठराविक कालावधीनंतर राशी परिवर्तन करतात. याचा परिणाम सर्व 12 राशींसह देशभरात पाहायला मिळतो. गुरु ग्रह बृहस्पती वर्षातून एकदा राशी परिवर्तन करतात. त्यामुळे या कालावधीत कोणत्या ना कोणत्या ग्रहांबरोबर युती चा संयोग जुळून येतो. त्याचप्रकारे, गुरुचा संयोग ग्रहांचा राजा सूर्याबरोबर होणार आहे. यामुळे अर्धकेंद्र नावाचा योग निर्माण होणार आहे. त्यामुळे हा काळ कोणत्या राशींसाठी शुभ असेल ते जाणून घेऊयात. 

वैदिक पंचांगानुसार, 24 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 2 वाजून 22 मिनिटांनी सूर्य-गुरु ग्रह एकमेकांच्या 45 डिग्रीवर असणार आहेत. यामुळे अर्धकेंद्र योग निर्माण होतोय. सध्या गुरु ग्रह आपल्या मित्र ग्रहाच्या राशीत म्हणजेच मिथुन आणि सूर्य ग्रह स्वराशीत म्हणजेच सिंह राशीत विराजमान आहे. यामुळे अनेक राशींचं भाग्य उजळणार आहे. 

मिथुन रास (Gemini Horoscope)

मिथुन राशीसाठी सूर्य-गुरु ग्रहाचा अर्धकेंद्र योग लाभदायक ठरणार आहे. या राशीच्या लग्न भावात गुरु आणि तिसऱ्या भावात सूर्य विराजमान आहे. त्यामुळे या राशींना अनेक क्षेत्रात चांगला लाभ मिळेल. तसेच, या काळात समाजात तुम्हाला मान-सन्मान देखील मिळेल. कोर्टाच्या संबंधित सगळे प्रश्न सुटतील. तुमच्या आरोग्यात सुधारणा झालेली दिसेल. 

कर्क रास (Cancer Horoscope)

कर्क राशीच्या लोकांसाठी अर्धकेंद्र योग फार लाभदायक ठरणार आहे. या काळात तुमच्या आर्थिक उत्पन्नात चांगली वाढ झालेली दिसेल. तसेच, कुटुंबियांबरोबर तुम्ही चांगला वेळ घालवाल. तसेच, जे लोक अविवाहित आहेत त्यांच्यासाठी लग्नाचे नवीन प्रस्ताव येतील. तुमची लव्ह लाईफ चांगली चालेल. लवकरच तुम्हाला शुभवार्ता मिळण्याची शक्यता आहे. 

तूळ रास (Libra Horoscope)

तूळ राशीसाठी सूर्य-गुरुच्या युतीमुळे होणारा अर्धकेंद्र योग फार लाभदायक ठरु शकतो. या राशीच्या लोकांची अनेक वर्षांपासून रखडलेली कामे तुम्हाला पूर्ण करता येतील. तसेच, समाजात तुमची पद-प्रतिष्ठा वाढेल. या कालावधीत तुम्ही तुमचं ध्येय साध्य करण्यात यशस्वी व्हाल. गुरुंची तुमच्यावर विशेष कृपा असणार आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

हेही वाचा :                                                    

Weekly Horoscope : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशींसाठी ऑगस्टचा शेवटचा आठवडा नेमका कसा असणार? वाचा साप्ताहिक राशीभविष्य