Ardha Kendra Yog 2026 : अखेर तो क्षण आलाच! शुक्र-शनिच्या 'अर्धकेंद्र योगा'मुळे धनसंपत्तीत होणार भरभराट; 28 जानेवारीपासून 'या' 3 राशींची होणार कमाई
Ardha Kendra Yog 2026 : 28 जानेवारी रोजी सकाळी साडेसात वाजता शुक्र आणि शनि ग्रह एकमेकांच्या 45 डिग्री अंशावर असतील. ज्योतिष शास्त्रात या स्थितीला अर्धकेंद्र योग म्हणतात.

Ardha Kendra Yog 2026 : ज्योतिष शास्त्रानुसार, 2026 वर्षातला पहिला महिना म्हणजेच जानेवारीचा महिना संपण्याआधीच एक दुर्लभ योग जुळून येणार आहे. त्यानुसार, येत्या 28 जानेवारी रोजी सकाळी साडेसात वाजता शुक्र (Shukra Gochar) आणि शनि ग्रह (Shani Dev) एकमेकांच्या 45 डिग्री अंशावर असतील. ज्योतिष शास्त्रात या स्थितीला अर्धकेंद्र योग म्हणतात. सध्या शनि मीन राशीत विराजमान आहे. तर, शुक्र ग्रह मकर राशीत विराजमान आहे. मकर राशीत सूर्य-मंगळ-बुध आणि शुक्र ग्रह मिळून चतुर्ग्रही योगसुद्धा जुळून येणार आहे. त्यामुळे या अर्धकेंद्र योगाचा कोणकोणत्या राशींना लाभ मिळणार आहे ते जाणून घेऊयात.
वृषभ रास (Taurus Horoscope)
शनि आणि शुक्र ग्रहाचा दुर्लभ संयोग वृषभ राशीसाठी लाभदायक ठरणार आहे. या काळात तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळेल. तसेच, तुम्हाला प्रत्येक पावलावर नशिबाची साथ मिळेल. करिअरमध्ये तुम्हाला नवीन संधी तुमच्यासमोर चालून येतील. तुमच्या पदोन्नतीत वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच, व्यापारी वर्गातील लोकांना आपल्या व्यवसायात चांगला लाभ मिळेल. तुमची कमाई चांगली होईल.
मकर रास (Capricorn Horoscope)
शुक्र-शनिचा अर्धकेंद्र योग मकर राशीचं भाग्य उजळणार आहे. या काळात अनेक क्षेत्रात तुम्हाला चांगला लाभ मिळेल. करिअरमध्ये रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध झालेल्या दिसतील. तसेच, देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या संपत्तीतही भरभराट पाहायला मिळेल. तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळेल. समाजात तुम्हाला मान-सन्मान मिळेल. तसेच, भौतिक सुख सुविधांचा तुम्ही चांगला लाभ घ्याल. मित्रांच्या सहकार्याने तुमची अनेक कामे सहज शक्य होतील.
मीन रास (Pisces Horoscope)
मीन राशीसाठी अर्धकेंद्र योग फार अनुकूल ठरणार आहे. या काळात तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे तुम्हाला वेळेत पूर्ण करता येतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. तसेच, अचानक धनलाभ देखील होण्याची शक्यता आहे. या काळात तुम्हाला परदेशात जाण्याची संधीदेखील मिळणार आहे. जे तरुण नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी चांगल्या नोकरीची संधी लवकरच मिळेल. सरकारी योजनांचा तुम्ही लाभ घ्याल.
हे ही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)




















